नांदेड(प्रतिनिधी)-उमरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपुर्वीच एका अनुसूचित जातीच्या युवकाला आपल्या विवाहित मुलीवर प्रेम करतो म्हणून मुलीचे वडील, काका आणि आजोबा यांनी मिळून त्याची धिंड काढली आणि पुढे त्या दोघांना जिवे मारुन एका विहिरीत फेकून दिले. त्यानंतर घटना करणारे तिन्ही स्वत: पोलीस ठाणे उमरी येथे हजर झाले. त्याप्रकरणात नांदेडच्या पोलीस अधिक्षकांनी उमरी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरिक्षकांना बेस्ट डिटेक्शन अवार्ड दिले. काल दुपारी 2 वाजता घडलेल्या एका ऍट्रोसिटी प्रकरणाबाबत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितल्यानंतर उशीरा अर्थात आज पहाटे 2.33 वाजता हा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस ठाणे उमरीच्या हद्दीत राहणाऱ्या अनुसूचित जातीच्या एका 17 वर्षीय बालकाला 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजेच्यासुमारास त्याच्या मोबाईल क्रमांकावर फोन आला. त्यात फोन करणारा सांगत होता. मी स्वप्नील लाड उर्फ राजपूत बोलतो. तुला एका मुलीबद्दल बोलायचे आहे. तेंव्हा तलावाजवळ येे. तेंव्हा तो बालक आपले भाऊ संषर्घ बळीराम लांडगे, प्रशांत संभाजी लांडगे आणि गौरव बळी लांडगे असे सर्व मिळून गणपती विसर्जनाच्या तलावाजवळ गेले. त्यावेळी दुपारचे 3.30 वाजले होते. तेंव्हा तेथील उपस्थितीत युवकांपैकी स्वप्नील लाड त्या बालकाजवळ आला आणि त्याची इंस्टाग्राम आयडी दाखवून तु यावर आरएसएस मुर्दाबादचे पोस्ट टाकलेली आहेस. त्याची स्क्रिशॉर्ट दाखवली आणि मारणहाण करण्यास सुरू केली. यावेळी त्याने जातीवाचक शिवीगाळ करून अशी पोस्ट कशी ठेवलास असेही बोलले. त्यानंतर आपल्या कंबरेला असलेल्या बेल्टने साईप्रसादने मारहाण करत त्या बालकाला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उमरी मोंढा येथे नेले. त्यावेळी स्वप्नील लाड, साईप्रसाद सलगरे, रवि सोळंके, कमल जैयस्वाल, श्रेयश इरलेवाड हे सोबत होते. इतरही काही मंडळी होती त्यांची नावे या बालकाला माहित नाहीत. तेथे छत्रपती शिवाजी महाराज आणि विरशिरोमणी महाराणा प्रताप यांच्या फोटोंसमोर मला डोके टेकवून माफी मागायला लावली. त्यानंतर साईप्रसादने माझ्या गळ्यात बेल्ट टाकून ओढत असतांना माझा भाऊ संघर्ष बळी लांडगे हा मला सोडविण्यास आला असता रवि सोळंकेने त्याच्या डाव्या हाताला सिगरेटचे चटके दिले. आम्ही सर्व परत गावी आलोत आणि घडलेला प्रकार वडीलांना सांगून तक्रार दिली आहे.
या प्रकरणी उमरी पोलीसांनी बेकायद्याची मंडळी जमवणे, मारहाण करणे यासोबत अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार सार्वजनिक ठिकाणी अपमान करणे, जातीचा उल्लेख करणे आदी सदरांखाली गुन्हा क्रमांक 330/2025 दाखल केला आहे. या प्रकरणातील एफआयआरमध्ये तपासीक अंमलदारांचे नाव आणि पदनाव लिहिलेले नाही. गुन्हा हा अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्याचा असल्याने हा गुन्हा तपासासाठी पोलीस उपअधिक्षकांकडेच जाईल.
खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन बालकाने दिलेल्या फिर्यादीतील पाच आरोपींना उमरी पोलीसांनी अटक केली आहे. याचा अर्थ उमरीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक पुन्हा एकदा बेस्ट डिटेक्शन अवार्डचे हक्कदार झाले आहेत. कारण मागे सुध्दा त्यांना अशाच धिंड काढलेल्या प्रकरणात बेस्ट डिटेक्शन अवार्ड मिळालेले आहे. यापेक्षा महत्वपुर्ण माहिती अशी आहे की, काल वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत भेट घेतल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऍड. प्रकाश आंबेडकरांनी पोलीस अधिक्षकांना सांगितल्यानंतर ऍट्रासिटीचा गुन्हा दाखल
