जिल्ह्याचा किती छान विकास झालाय…..
टेक्स्काम बन्द झाली,सिप्टा बन्द झाली,वाजेगावची सुत गिरणी बन्द झाली,दुध डेयरी बन्द झाली,बहुजन समाजातील गरीब लोक पोट भरतील असा एकही उद्योग जिल्ह्य़ात नाही म्हणून हजारो सुशिक्षित बेरोजगार तरुण पुणे मुंबईला गेले,
साहेबानी एकच उद्योग कैला, चार चाटू हाताशी धरून आपलेच पोस्टर पावलोपावली झळकाविले..
जिल्ह्य़ातील या भयानक दुरदशेला लक्षात घेऊन एकही पत्रकार प्रश्न उपस्थित करीत नाहीत…साहेबानी पत्रकारिता ठार केली ,आता फक्त गुलाम पोहण्याचे काम केले…..कोणताही पेपर उघडा…..त्यात काय दिसते……
साहेब आले,
साहेब गेले
साहेब हसले
साहेब बसले
साहेबाचा सत्कार
साहेबाचे अभिनंदन
साहेबाचा जयजयकार
साहेबानी सार्वजनिक हिताचे एकही काम कैले नाही ….फक्त आपली बायको,आपली मुले याच्यासाठी आम्हास वेठीस धरले….आमचा काय गुन्हा…..
तरीही साहेब म्हणतात, मलाच निवडून द्या….
साहेब, आजही जिल्ह्य़ातील 300 गावात स्मशानभूमीत वाद सुरू आहेत. माणूस मेल्यावर त्याचा अन्त्यसस्कार करायला जागा नसल्यामुळेच त्याचे शव पोलीस ठाण्यात नेवून न्याय मागितला जात आहे .ज्या सामान्य माणसाने तुम्हाला मत दिले त्याला जीवनभर हाल अपेष्टा सोसाव्या लागल्या मेल्यावरही जागा मिळत नाही .
साहेब यावर काहीच बोलत नाहीत..
साहेबाच्या घरी रोज दिवाळी,शेतकऱ्याच्या घरी शिमगा आणि होळी…हे साहेबाना कसे दिसत नाही….प्रश्न विचारणारे,पेपरात लिहिणारे सारेच गुलाम झाले …
पैशाचा हैदोस ,,खुशामतखौराचा नंगानाच सुरू आहे…शेतकरी कपाळावर हात मारून रडत आहेत…
लेखक – माधव अटकोरे
