नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाने 2 सप्टेंबर रोजी काढलेल्या काळ्या जीआरच्या विरोधात ओबीसी महाएल्गार मोर्चाचे आयोजन ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली उद्या दि.29 रोज बुधवारी नवा मोंढा येथून सकाळी 11 वाजता या मोर्चाची सुरूवात होणार आहे.
राज्य शासनाने 2 सप्टेंबर रोजी ओबीसीच्या मुळावर काळा जीआर काढून मराठा समाजाला ओबीसीत समावेश करण्याचे महापाप सध्याच्या राज्य सरकारने केले आहे. हा जीआर रद्द करण्यात यावा या मागणीसाठी ओबीसी समाजाच्यावतीने महाएल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा नांदेड शहरातील नवा मोंढा मैदानावरून सकाळी 11 वाजता काढण्यात येणार आहे. हा मोर्चा डॉ.अण्णाभाऊ साठे चौक मार्ग ते चिखलवाडी कॉर्नर असा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. या मोर्चाला संबोधन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर, ओबीसचे नेते प्रा.लक्ष्मण हाके, बबन वाघमारे, ऍड. अविनाश भोसीकर, डॉ.बी.डी.चव्हाण यांच्यासह आदींची उपस्थिती राहणार आहे. तरी जास्तीत जास्त ओबीसी बांधवांनी या मोर्चात सहभाग नोंदवून ओबीसीच्या हक्काचे आरक्षण वाचविण्याच्या लढाईत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात उद्या ओबीसीचा महाएल्गार मोर्चा
