नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी 28 ऑक्टोबर रोजी 3 अवैध वाळू वाहतुक करणाऱ्या गाड्यांवर कार्यवाही करून जवळपास 17 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कार्यवाहीमधील आरोपी मात्र अज्ञात आहेत.
दि.28 ऑक्टोबर रोजी पिंपळगाव निमजी शिवारातील गोदावरी नदीपात्रात, मौजे वाहेगाव शिवारातील गोदावरी नदीपात्रात आणि गंगाबेट शिवारातील गोदावरी नदीपात्रात तीन तासात वेगवेगळ्या कार्यवाह्या करून पोलीसांनी 1 लाख 50 हजार रुपये किंमतीची 30 ब्रास अवैध वाळू, 10 लाख रुपये किंमतीचे 20 तराफे आणि नदीपात्रातून रेती उपसा करणारे दोन इलेक्ट्रीक इंजिन किंमत 6 लाख रुपये असा एकूण 17 लाख 50 हजारांचा ऐवज जप्त केला आहे. तीन वेगवेगळे स्वतंत्र गुन्हे या संदर्भाने दाखल करण्यात आले आहेत. मात्र या सदरात आरोपी मात्र अज्ञात व्यक्तीचे नाव आहे.
ही कार्यवाही पोलीस उपअधिक्षक प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर, पोलीस उपनिरिक्षक व्यंकट कुसमे, पोलीस अंमलदार शेख इब्राहिम, अर्जुन मुंडे, गव्हेंद्र सिरमलवार, जमीर, आसीफ, कांबळे, पलेपवाड आणि शंकर माळगे यांनी केली आहे.
अज्ञात वाळू चोरांवर तीन गुन्हे दाखल; 17 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त
