लग्नास नकार; ४५ वर्षीय महिलेला ३५ वर्षीय व्यक्तीकडून खून 

नांदेड(प्रतिनिधी)- जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील मौजे पाटोदा खुर्द येथे घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण परिसराला हादरवून गेली आहे. “प्रेमाचा रंग रक्ताच्या लाल सागरात बदलला” असे म्हणावे लागेल, कारण लग्नास नकार दिल्याच्या संतापातून एका ३५ वर्षीय पुरुषाने ४५ वर्षीय महिलेला निर्दयतेने ठार मारल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.

तक्रारदार दत्ता कोंडीबा धुमाळे यांच्या माहितीनुसार, दिनांक २५ ऑक्टोबरच्या मध्यरात्री १ ते ३ वाजेच्या सुमारास, पाटोदा खुर्द येथे राहणाऱ्या मंगल कोंडीबा धुमाळे (वय ४५) यांच्यावर कृष्णा गणेश जाधव (वय ३५) या व्यक्तीने लग्नासाठी दबाव आणला. परंतु, मंगल यांनी नकार दिल्यावर आरोपीने रागाच्या भरात तिच्यावर हल्ला करून निर्घृणपणे खून केला.

या घटनेने गावात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. किनवट पोलिस ठाण्यात गुन्हा क्र. २९६/२०२५ दाखल करण्यात आला असून, भारतीय दंड विधानातील खुनाच्या कलमांसह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमांचाही समावेश करण्यात आला आहे.

या गंभीर प्रकरणाचा तपास माहूर उपविभागाचे पोलिस उपअधिक्षक भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.स्थानिक ग्रामस्थांमध्ये या घटनेबाबत संतापाची लाट उसळली असून, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी सर्व स्तरांतून मागणी होत आहे.“प्रेमाच्या नावाखाली केलेला हा अमानुष अत्याचार समाजाला चिरंतन प्रश्न विचारून गेला आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!