नांदेड(प्रतिनिधी)-फटाका दुकानदाराला चाकूचा धाक दाखवून तिन जणांनी 15 हजार रुपयांचे फटाके बळजबरीने चोरून नेल्याचा प्रकार 22 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.30 वाजता घडला आहे.
शुभम राजेशसिंह परदेशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 22 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.30 वाजेच्यासुमारास हिंगोली गेटजवळच्या मैदानात त्यांच्या शुभारंभ फटाक्याच्या दुकानात अंगद महाराज व दोन अनोळखी व्यक्ती आले. त्यांनी शुभम परदेशीला चाकूचा धाक दाखवून त्यांच्या दुकानातील 15 हजार रुपयांचे फटके बळजबरीने चोरून नेले आहेत. वजिराबाद पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा क्रमांक 434/2025 दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक लोंडे अधिक तपास करीत आहेत.
फटाका दुकानदाराला चाकूचा धाक दाखवून 15 हजार रुपयांचे फटके नेले
