नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी तीन आयचर वाहने पकडून त्यात कोंबून भरलेले जनावरे पकडली आहेत. गाड्या आणि जनावरे मिळून हा संपुर्ण मुद्देमाल 36 लाख 25 हजारांचा आहे.
पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर, पोलीस निरिक्षक ज्ञानेश्र्वर मठवाड, पोलीस अंमलदार शेख इब्राहिम, पवार, नितीन गंगलवाड, मारोती पचलिंग हे दि.21 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता नांदेडच्या उजव्या रस्त्यावर टापरे चौक वाजेगाव येथे पोहचले. तेथे तीन वेगवेगळे आयचर उभे होते. त्यांचे क्रमांक एच.आर.45 डी. 5431 ज्याची किंमत 7 लाख रुपये. त्यामध्ये एक बैल आणि दोन वासरे असा एकूण 9 लाख 20 हजारांचा गोवंश. दुसरी गाडी क्रमांक एच.आर.45 डी.0757 किंमत 7 लाख रुपये आणि त्यामध्ये 12 मुराजातीच्या म्हशी आणि लहान वासरे असा एकूण 14 लाख 50 हजारांचा मुद्देमाल. तिसरी गाडी क्रमांक एच.आर.45 सी. 7698 किंमत 7 लाख रुपये किंमतीची आणि त्यात 11 मुरा जातीच्या म्हशी आणि एक वासरु असा 21 लाख 55 हजारांचा मुद्देमाल पाहिला. ही सर्व जनावरे अत्यंत दाटीवाईटीने कोंबुन, कु्ररतेने वागणूक देवून वाहतुक करतांना मिळाली. याबाबत पोलीस अंमलदार मारोती पंचलिंग यांच्या तक्रारीवरुन संजीवकुमार सोमदत्त शर्मा (46)रा.खेडी, रामफल दर्शनलाल (46) रा.कर्नल, रामज्वारी मियासिंग मुन्नारेहडी रा.कैथल सर्व राज्य हरीयाणा यांच्याविरुध्द गुन्हा क्रमांक 1010/2025 प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 नुसार दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपअधिक्षक प्रशांत शिंदे यांनी नांदेड ग्रामीण पोलीसांचे कौतुक केले आहे.
नांदेड ग्रामीण पोलीसांनी जनावरे कोंबून भरलेल्या तीन गाड्या पकडल्या; 36 लाखांचा मुद्देमाल जप्त
