राज्य शासनाचा आदेश : चार अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या बदली – दिवाळीपूर्वी प्रशासनात मोठ्या प्रमाणात फेरबदल

मुंबई (प्रतिनिधी)-राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या उपसचिव महेश वरुडकर यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार चार अपर जिल्हाधिकारी पदाच्या अधिकाऱ्यांच्या बदली व नवीन पदस्थापना करण्यात आली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या बदली आदेशामुळे प्रशासनात हालचाली सुरू झाल्या आहेत.

 

या आदेशानुसार, नांदेड जिल्ह्यात कार्यरत असलेले अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग शंकरराव बोरगावकर (कांबळे) यांची बदली लातूर जिल्ह्यातील जिल्हा जात प्रमाणपत्र तपासणी समितीचे अध्यक्ष म्हणून करण्यात आली आहे. बोरगावकर हे अत्यंत कर्तबगार व कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून ओळखले जातात.

 

दरम्यान, नांदेड जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी पदावर डॉ. रत्नदीप गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, प्रदीप प्रभाकर कुलकर्णी यांना गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती मिळाली आहे.याशिवाय, निशिकांत श्रीधरराव देशपांडे यांना प्रपत्र बढती देऊन राज्यपालांचे प्रबंधक, मुंबई येथे प्रतिनियुक्तीवर बदली करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!