मांडवी(प्रतिनिधी)-पिंपळगाव फाटा परिसरात एका महिलेला दिशाभूल करून 11 हजार रुपयांच्या चांदीच्या पाटल्या लांबवण्याची घटना घडली आहे. ही घटना 14 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास पेट्रोल पंपासमोर घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मीबाई माधव पेटकुले या महिला पिंपळगाव फाटा येथे जात असताना एका अनोळखी व्यक्तीने त्यांना थांबवले. त्याने “मांडवीकडे जाणारा रस्ता हाच आहे का?” अशी विचारणा केली. एवढ्यातच त्या व्यक्तीने महिलांच्या कमरेला बांधलेल्या कापडी पिशवीत ठेवलेल्या ₹11,200 किमतीच्या चांदीच्या पाटल्या चोरून नेल्या.घटनेनंतर महिलांनी मांडवी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा क्र. 9.5/2025 नोंदवला आहे. महिला पोलीस अंमलदार कन्नाळे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.मी,मांडवी पोलिसांनी नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला असून गर्दीच्या ठिकाणी किंवा रस्त्यात अनोळखी व्यक्तींशी संवाद साधताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
