करंटचा धोका टाळा — सुरक्षिततेने उजळवा दिवाळी!”*

 

*दिवाळीचा सण म्हणजे प्रकाशाचा उत्सव — आनंद, रंग, उजेड आणि सजावटीची सोहळा!*

*पण या प्रकाशाच्या सणासोबत अदृश्य धोकाही येतो — तो म्हणजे “इलेक्ट्रिकल करंटचा”.*

*दरवर्षी दिवाळीच्या काळात वीजेच्या तारा, चुकीच्या सजावटीच्या माळा, आणि निष्काळजीपणामुळे अनेक जण अपघाताचे बळी ठरतात.*

*आपला आनंद दुःखात बदलू नये म्हणून सावधगिरी आणि वैज्ञानिक प्रथमोपचाराचे ज्ञान अत्यावश्यक आहे.*

*विद्युत रोषणाई करताना घ्यावयाची काळजी*

*1. वायर तपासणी करा:*

*कुठलीही वायर तुटलेली, किंवा आवरण निघालेली असल्यास ती बदलावी किंवा इन्सुलेशन टेप लावावी.*

*2. सॉकेटचा योग्य वापर:*

*एका सॉकेटमध्ये अनेक पीन लावू नका. ओव्हरलोडमुळे शॉर्टसर्किट किंवा स्पार्किंग होऊ शकते.*

*3. फटाक्यांपासून अंतर ठेवा:*

*विजपुरवठ्याच्या जाणाऱ्या, व येणाऱ्या वायरखाली अनार, रॉकेट किंवा इतर फटाके फोडू नयेत.*

*4. रात्री सुरक्षितता पाळा:*

*झोपण्यापूर्वी आणि दुकान बंद करताना सर्व बाहेरील लाईट व मेन स्विच बंद करावा. घरच्या बाहेरील सर्व शोभनीय माळा बंद करून टाकावे* *5. धातूवर लाईट माळ लावू नका:*

*लोखंडी जाळी किंवा धातूच्या वस्तूंवर लाईट लावल्यास करंट संपूर्ण धातूमध्ये पसरू शकतो.*

*6. गुंडाळलेली वायर टाळा:*

*कमी क्षमतेच्या विद्युत तारा एकाच ठिकाणी गुंडाळल्यास उष्णता निर्माण होऊन आग लागू शकते.*

*7. ISI मार्क असलेले उपकरणे, व वायर वापरा:*

*स्वस्त व नॉन-ISI उत्पादने टाळा. नेहमी दर्जेदार व प्रमाणित वस्तूंचा वापर करा.*

*अपघात झाल्यास प्रथम कृती*

*1. सर्वप्रथम मेन स्विच बंद करा.*

*जर शक्य नसेल, तर महावितरण कंपनीला त्वरित माहिती द्या.*

*इन्व्हर्टर असेल तर तोही बंद करा.*

*2. व्यक्तीला थेट हात लावू नका.*

*सुक्या लाकडाची काठी, प्लॅस्टिक पाइप, रबर , किंवा सुती कापड , घोंगडी यांचा वापर करून व्यक्तीला करंटच्या स्त्रोतापासून दूर करा.

विजेला चिकटलेल्या व्यक्ती ला ओल्या हातांनी, पायाने किंवा धातूच्या वस्तूंनी स्पर्श करू नका.*

*3. आग लागल्यास:*

*करंट चालू असताना पाणी वापरू नये.*

*कोरडी रेती, वाळू टाका किंवा विजेद्वारे लागलेली आग विझविण्याचे अग्नीशामक वापरा.*

*इलेक्ट्रिकल करंट लागलेल्या व्यक्तीला देण्यात येणारी “वैज्ञानिक प्रथमोपचार पद्धत” (Scientific First Aid)*

*टप्पा 1 : परिस्थिती सुरक्षित करा म्हणजे करंट पासून दुर करावे*

*स्वतःचा जीव धोक्यात न घालता जागा सुरक्षित करा*

*मेन स्विच बंद केल्यानंतरच अथवा लाईट बंद केल्या नंतरच अपघाती व्यक्तीला स्पर्श करा*

*टप्पा 2 : व्यक्तीची स्थिती तपासा*

*व्यक्ती बेशुद्ध आहे का, श्वास घेतोय का हे पाहा. श्वास बरोबर चालु असेल त्याला प्रेमाने बोला रागावू नका, ती व्यक्ती काही खाण्यापिण्याच्या स्थितीत असेल तर त्याला उत्तेजक द्रव्ये पाजवा जसे चहा कॉफी परंतु जबरदस्तीने नाही.*

*बेशुद्ध पडली असल्यास डॉक्टर येईपर्यंत त्याचे कपडे सैल करून त्याला सपाट चांगल्या जागेवर सरळ आमारामदायी अवस्थेत झोपवून त्याच्या वर ताबडतोब प्रथमोपचार सुरू करा.

*3) प्रथमोपचार देण्याची एक पद्धत. करंट लागलेल्या व्यक्ती खुप घाबरलेल्या अवस्थेत असतो त्यामुळे त्याला प्रेमाने व आपुलकी ने बोलणें जरुरीचे आहे. तो गुदमरलेल्या स्थितीत असतो कृत्रिम श्वासोच्छवास देऊन त्याला पुर्ववत करने जरुरीचे असते.*

*(1) व्यक्तीला सपाट व कठीण पृष्ठभागावर झोपवा.*

*(2) त्याच्या बाजूला गुडघ्यावर बसा.*

*(3) त्याच्या तोंडांत तोंड घालून कृत्रिम श्वासोच्छवास दमा दमा ने देत रहा*

*(4) दोन हात एकावर एक ठेवा ५ सें.मी. खोलीपर्यंत छाती दाबा दर मिनिटाला 100–120 दाब द्या.*

*(5) प्रत्येक ३० दाबांनंतर दोन वेळा “कृत्रिम श्वास” द्या*

*(6) हे पुनरावृत्ती करत रहा जोपर्यंत वैद्यकीय मदत पोहोचत नाही.*

*टप्पा 4 : भाजलेल्या जागेवर उपचार करंट लागलेल्या जागी थंड पाणी (१०–१५ मिनिटे) हळुवार ओतावे.*

*बर्फ थेट लावू नये.*

*अँटीसेप्टिक क्रीम किंवा सॅनिटरी गॉझ बांधावी.*

*फोड आले असल्यास त्याला हात लावू नका.*

*टप्पा 5 : तात्काळ वैद्यकीय मदत*

*108 आपत्कालीन क्रमांकावर फोन करा आल्यावर रुग्णाला शक्य तितक्या लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचवा.*

*सुरक्षिततेसाठी आधुनिक उपकरणांचा वापर*

*E.L.C.B. (Earth Leakage Circuit Breaker) बसवा — करंट लीकेज होताच वीज पुरवठा बंद करते.*

*MCB (Miniature Circuit Breaker) वापरा — ओव्हरलोड झाल्यास वीज आपोआप बंद होते.*

*योग्य अर्थिंग आणि वायरिंगची तपासणी दर वर्षी तज्ञाकडून करून घ्या.*

*मुलांना इलेक्ट्रिकल उपकरणांपासून दूर ठेवा.*

*सण साजरा करा, पण सावधगिरीसह!*

*दिवाळीचा प्रकाश आनंद देतो, पण निष्काळजीपणा जीव घेऊ शकतो.*

*सुरक्षितता आणि प्रथमोपचाराचे ज्ञान आपला आणि आपल्या प्रियजनांचा जीव वाचवू शकते.*

*प्रकाशाचा सण उजळू द्या — पण सुरक्षिततेच्या मार्गानेच!*

*राजेंद्र सिंघ शाहू इलेक्ट्रिकल ट्रैनंर नांदेड 7700063999*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!