नांदेड– नांदेड जिल्ह्यात जयहिंद ऑटो सेना स्थापन झाल्यापासून शहरात ऑटो चालकात एक वेगळा उत्साह पाहायला मिळतो आहेः अल्पावधीतच शहराच्या काना कोपऱ्यापासून ते जिल्ह्यात जयहिंद ऑटो सेनेचा बोलबाला पहायला मिळत आहे. सदरील ऑटो सेना संस्थापक अध्यक्ष डॉ मोहम्मद आरीफखान पठाण यांनी स्थापन केलेली आहे. जो राज्यात कोणत्याही संघटनेने कार्य केले नसेल ती पठाण यांनी करून दाखवली आहे. या संघटनेचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद साजिद राज यांना नियुक्ती देऊन जिल्ह्यात आपला परचम रोवला आहे.

जयहिंद ऑटो सेनेतर्फे मागे ऑटो चालक मालकाना मोफत ड्रेस वाटप करण्यात आले आहे. तद्नंतर 15 हजाराचे बिनव्याजी कर्ज ऑटो चालक मालक सभासदांना देण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यात सभासद असलेली ही एकमेव संघटना असून ती मौलाना आझाद अल्पसंख्याक मिशन संस्था NGO या वेबसाईट वर या संघटनेचे कार्य बघायला मिळतील अशी संघटना राज्यातील पहिली आहे.
काल सायंकाळी 7 च्या सुमारास आमचे जयहिंद ऑटो सेनेचे पदाधिकारी सय्यद अहेमद सय्यद मुसा हे नित्य नियमाप्रमाणे आपला ऑटो चालवित असताना जुनामोंढा येथून तीन प्रवासी बसले होते. त्यात दोन पुरुष आणि एक महिला असे होते यातील एक महिला व एक पुरुष शिवाजी नगर येथे उतरले जो मोबाईल ऑटो मध्ये विसरले होते. यावेळेस ऑटो चालवित असताना वायब्रेशन मुळे मागे खडखड आवाज येत असल्याने त्याने तो मोबाईल आपल्या जवळ ठेवला आहे अन्यथा सदरील मोबाईल तिसऱ्या प्रवाशी नेला असता. यामुळे लगेच ऑटो चालकाने थेट जयहिंद ऑटो सेनेचे कार्यालय गाठून सदरील मोबाईल धारकाशी संपर्क साधून बोलाविले गेले. तो मोबाईल श्रद्धा होमिओ न्याचुरो रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर शिवाजी नगर मधील डॉ प्रज्ञा कसबे यांचा होता सोबत डॉ एकनाथ इबीते आणि मुलगी यांना तो आई फोन 16 प्रो जवळपास सव्वा लाखाचा मोबाईल परत देण्यात आले आहे. यावेळी मोबाईल परत मिळाल्याचा आनंद गगनात मावत नव्हता. त्या आनंदामुळे त्यांनी ऑटो चालकाचा सत्कार करीत 500 रुपये बक्षीस देण्यात आले आहे.
यावेळी जयहिंद ऑटो सेनेचे पदाधिकारी वासियोद्दीन इनामदार. हारून अली. खाजा खान. शहाबुद्दीन. मो वाहेद. सदस्य सय्यद अजीज इत्यादी उपस्थित होते.
