नांदेड-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील स्वागत कक्षामध्ये आज दि.१५ ऑक्टोबर रोजी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मनोहर चासकर यांनी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार, अधिष्ठाता डॉ. एम, के. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. हुशारसिंग साबळे, रासेयोचे संचालक डॉ. मारुती गायकवाड, डॉ. अशोक टीपरसे, कार्यकारी अभियंता तानाजी हुस्सेकर, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, डॉ. लक्ष्मीकांत आगलावे यांच्यासह विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
