नांदेड(प्रतिनिधी)-अनैतिक संबंधातून आपल्या पतीचा खून केल्याप्रकरणी पत्नी आणि तिच्या प्रियकराला विशेष न्यायालयाने 18 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार किनवट पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार त्याचा भाऊ 3 सप्टेंबर 2025 रोजी गायब झाला होता. त्या संदर्भाने पोलीस ठाणे किनवट येथे मिसिंग क्रमांक 37/2025 दाखल करण्यात आला. त्यानंतर त्या महिलेने तक्रारीत असे लिहिले आहे की, त्यांच्या भावाची पत्नी प्रियंका हिने तिच्या ओळखीच्या माणसाकडून ज्याचे नाव शेख रफीक आहे. त्याच्यासोबत एका टिनशेडमध्ये जाते आणि येते अशी माहिती मिळाली. त्यानुसार पुढे असे कळले की, पोलीसांनी काढलेल्या सीडीआरनुसार शेख रफीक शेख नासीरने विनोदची पत्नी प्रियंकासोबत अनैतिक संबंध असल्यामुळे विनोदला दारु पाजून दारुच्या नशेत असतांना प्रियंका आणि शेख रफिक यांनी विनोदला मोटारसायकलवर नेऊन खरबी टीपॉईंटवर पुराने भरलेल्या नदीपात्रात फेकून दिले. माझ्या भावाचा खून वहिनी प्रियंका आणि शेख रफीक शेख नासीर या दोघांमधील अनैतिक संबंधामुळे घडला आहे. किनवट पोलीसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाप्रमाणे गुन्हा क्रमांक 292/2025 दाखल केला. शेख रफीक शेख नासीर (43) आणि प्रियंका (41) या दोघांना अटक झाली.
किनवटचे पोलीस उपअधिक्षक रामकृष्ण मळघणे यांनी प्र्रियकर आणि प्रियसीला न्यायालयात हजर केले. न्यायालयात सरकारी वकील ऍड.एम.ए.बत्तुला यांनी या प्रकरणाच्या तपासात प्रगती होण्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचा मुद्दा मांडला. न्यायाधीशांनी या दोघांना 18 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
पतीचा खून करणारी पत्नी आणि प्रियकर पोलीस कोठडीत
