नांदेड–दि. 12 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11:00, दुपारी 03:00, सायंकाळी 05:00 व रात्री 09:00 वाजता नायगाव तालुक्यातील टाकळी (बु) या गावात भूगर्भातून आवाज येऊन जमीन हादरली असल्याची माहिती ग्रामस्थांनी प्रशासनाला दिली . त्यानुसार राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावर तपासले असता या आवाजाची/ धक्क्याची कुठलीही नोंद झाली नसल्याचे आढळून आले. तरीही अजून सूक्ष्म अभ्यास करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील अर्थ सायन्स विभागाचे प्राध्यापक डॉ. टी. विजयकुमार यांना देखील माहिती घेण्यास सांगितले आहे. या धक्क्यामुळे कुठलीही जीवित व वित्त हानी झाली नसल्याबाबत तहसीलदार नायगाव यांनी जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास कळविले आहे. तरी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे. तसेच गावात ज्या लोकांच्या घराचे छत पत्र्याचे आहे व त्यांनी पत्र्यावर आधारासाठी दगड ठेवले आहेत त्यांनी सुरक्षिततेचा भाग म्हणून त्वरित दगड काढून घ्यावेत व पत्रे बोल्ट ने फिट करून घ्यावीत. पुन्हा असा आवाज आलाच तर पटकन घराबाहेर मोकळ्या जागेत गोळा व्हावे व प्रशासनाला (02462) 235077 या क्रमांकावर संपर्क करून कळवावे तसेच कोणत्याही अफवांनावर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जनतेला केले आहे.
More Related Articles
मुक्रामाबाद पोलीसांनी घरफोडीत तीन आरोपींना घेतले ताब्यात
नांदेड(प्रतिनिधी)-मुक्रामाबाद पोलीस हे रात्री गस्त घालत असतांना त्यांना हिपरगा फाटा येथे तीन संशयीत आढळून आले.…
जिल्हा रुग्णालयात हृदयरोग निदान व आरोग्य शिबीर संपन्न
शिबिरात 181 बालकांची तपासणी तर 75 पात्र बालकांवर किम्स हॉस्पिटल ठाणे येथे लवकरच मोफत हृदय…
सत्संगाने प्रेरित होवून भक्ती मार्गक्रमणा करणे म्हणजेच उपासना-युगलशरणजी महाराज
नांदेड,(प्रतिनिधी)-संतांच्या संगतीत राहून त्यांच्या विचारांशी आपले विचार जोडून भक्ती मार्गावर चालत राहणे हीच खरी उपासना…
