‘ज्ञानतीर्थ २०२५’ युवक महोत्सवामध्ये कव्वाली

नांदेड – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पसचे विज्ञान महाविद्यालय, विष्णुपुरी, नांदेड आयोजित ‘ज्ञानतीर्थ २०२५’ आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवामध्ये क्रांतीवीर बिरसा मुंडा कला मंच क्र.१ येथे कव्वालीच्या सुरेल वातावरणाने उजळला.

सायंकाळी पार पडलेल्या या सत्रात यशवंत महाविद्यालय, नांदेड येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कव्वालीने प्रेक्षकांची मनं जिंकली.

मुख्य गायिका माधवी मठपती व दुर्गा जगदंबे यांच्या नेतृत्वाखाली विद्या पांचाळ आणि भक्ती भारती यांनी सहगायन केले. “अल्ला ए अदा कैसी है, इन हसीनो की” या कव्वाली बोलांनी वातावरण भारावून गेले.

वाद्यत रोहन वेडे (हार्मोनियम व बॅन्झो), उदय जाधव (ढोलकी) आणि वैभव कदम (तबला) यांनी सुरेल साथ देत सादरीकरण अधिक प्रभावी बनवले.

या कव्वाली संघात माधवी मठपती, दुर्गा जगदंबे, विद्या भारती, रोहन वेडे, वैभव कदम, उदय जाधव आदींचा सहभाग होता.

सुंदर आवाज, तालबद्ध वादन आणि भावपूर्ण सादरीकरणामुळे प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट झाला. या कव्वालीने युवक महोत्सवाच्या सांस्कृतिक रंगमंचाची सुरुवात अविस्मरणीय केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!