नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील विमानतळ हद्दीत दोन जबरी चोरीचे गुन्हे घडले आहेत. त्यात एकूण 20 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
साहेबराव चंदामी पतंगे हे 71 वर्षीय व्यक्ती 7 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.30 वाजता पिरबुऱ्हाण चौकातनू पायी जात असतांना मोटार सायकलवर दोन लोक आले आणि त्यांच्या हातातील 8 हजार रुपये किंमतीचा फोन, चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम 2 हजार 500 रुपयांचे असा 10 हजार 500 रुपयांचा ऐवज बळजबरीने चा ेरून नेला आहे. या प्रकरणी विमानतळ पोलीसांनी गुन्हा क्रमांक 410/2025 दाखल केला आहे. गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक जोंधळे हे करणार आहेत.
दुसऱ्या घटनेत विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतच नमस्कार चौक ते महाराणा प्रताप चौक दरम्यान 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता अंजली रमेश धुतमल या महिला पायी जात असतांना कोणी तरी चोरट्यांनी त्यांचा 10 हजार रुपयांचा मोबाईल व इतर साहित्य असा 11 हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने चोरुन नेला आहे. विमानतळ पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 411/2025 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक जोंधळे हे करणार आहेत.
विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरीचे दोन प्रकार
