दारु विक्री करून जमलेले 3 लाख 50 हजार रुपये तिन चोरट्यांनी बळजबरीने चोरले

नांदेड(प्रतिनिधी)-तिन अज्ञात दरोडेखोरांनी उमरी गावात देशी दारु विक्री करून घरी जाणाऱ्या व्यक्तीकडून 3 लाख 50 हजार रुपये रोख रक्कम बळजबरीने चोरून नेले आहेत.
पंदीविला परघु गौंड रा.येल्लारेड्डीपेठ जि.सिरसिरला ह.मु.बालाजी गल्ली उमरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.45 वाजता ते आपल्या देशी दारु दुकानातील देशी दारु विकून जमा झालेले 3 लाख 50 हजार रुपये थैलीत भरून जात असतांना दुचाकीवर आलेल्या तिन जणांनी त्यांच्या हातातील 3 लाख 50 हजार रुपयांची थैली बळजबरीने चोरून नेली आहे. या प्रकरणी उमरी पोलीसांनी गुन्हा क्रमांक 318/2025 दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक आरमाळ अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!