“पूर पश्चात आरोग्य शिबिर” धानोरा ता. भोकर येथे संपन्न

भोकर- पूर ग्रस्त गावामध्ये पूर पश्चात आरोग्य शिबीर आयोजित करण्या बाबत जिल्हाधिकारी नांदेड मा. राहुल कर्डीले सर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड मा. मेघना कावली मॅडम यांनी सूचित केल्या नुसार व मा. डॉ. संगीता देशमुख मॅडम जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्या मार्गदर्शना नुसार व मा. डॉ. संदेश जाधव सर तालुका आरोग्य अधिकारी भोकर यांच्या नियोजनानुसार भोकर तालुक्यातील पूर ग्रस्त गावामध्ये पूर पश्चात आरोग्य शिबीर दि. ३ ऑक्टोबर २०२५ रोजी मौजे धानोरा ता.भोकर जिल्हा नांदेड येथे पूर पश्चात आरोग्य शिबिर घेण्यात आले.

या आरोग्य शिबिराचे उद्घाटन धानोराचे सरपंच मा. वंदना ताई राजेश्वर करपे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदेश जाधव सर यांच्याद्वारे करण्यात आले.

हे आरोग्य शिबिर घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र किनी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. वागदकर मॅडम, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. उमेश जाधव, डॉ. राजपूत, भोकर तालुका आरोग्य पर्यवेक्षक (हिवताप) मोहन पाटील पेंढारे, आरोग्य सेविका वाघमारे ताई, आरोग्य सेविका पाईकराव ताई, आरोग्य सेवक राजरवाड दादा, धानोरा येथील अंगणवाडी सेविका भाडमुखे ताई, पोतरे ताई व मदतनीस ताई, आशा ताई भडंगे, समाज सेवक नागसेन कावळे व अतुल कानवटे यांच्या उपस्थित आरोग्य शिबीर करण्यात आले.

या आरोग्य शिबिरामध्ये एकूण १५१ रुग्ण तपासणी करण्यात आली. या मध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह तपासणी ५७, स्त्री कर्करोग तपासणी ३३, गर्भाशय कर्करोग तपासणी ११, नेत्र रोग तपासणी ६१, हिमोग्लोबिन ६३ तपासणी, संशयीत क्षय रोग तपासणी ३२, कुष्ठरोग तपासणी ७, मुख कर्करोग तपासणी ५७, गरोदर माता तपासणी ४, सॅम/मॅम बालके तपासणी ४, सिकलसेल तपासणी ३०,सिबीसी तपासणी ३०, थायरॉईड तपासणी १ आदी तपासण्या करण्यात आल्या तसेच राष्ट्रीय किटक जन्य रोग कार्यक्रम अंतर्गत डेंग्यू, मलेरिया, हत्तीरोग या आजार बाबत माहिती दिली, आठवड्यातून एक दिवस घरातील पाणी साठे घासून, पुसून कोरडे करायचे व कोरडा दिवस पाळायचा, साथ रोग बाबत आरोग्य शिक्षण दिले व किटक शास्त्रीय सर्वेक्षण करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!