नायगाव (प्रतिनिधी)-अहिंसेचे पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी 2 ऑक्टोबर रोजी नांदेड हैदराबाद रस्त्यावरील गडगा गावा जवळ एक प्रेत सापडले. या युवकाचा खून दुसऱ्या युवकाने आपल्या पत्नीकडे वाईट नजरेने पाहतो या कारणासाठी केलेला असल्याचा खुलासा गुन्हा दाखल झाल्यानंतर समोर आला.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार डोंगरगाव तालुका मुखेड येथील शेख अब्बास शेख रमजानसाब आणि त्याच गावातील सय्यद जीशान सय्यद लतीफ वय 17 या युवकांचे मोहरमच्या दिवशी भांडण झाले होते. या भांडणाचा तोडगा निघाला आणि दोन्ही पुन्हा मित्र झाले. १ ऑक्टोबर रोजी शेख अब्बासने सय्यद जिशानला सोबत नेल्याचे अनेकांनी पाहिले आणि त्यानंतर सय्यद जीशान घरी आला नाही तेव्हा त्याच्या कुटुंबीयांनी अनेक जागी विचारणा केली. सोबतच शेख अब्बास कडे सुद्धा विचारणा केली पण त्याने उडवा उत्तरे दिली. पुढे 2 ऑक्टोबर रोजी सकाळी सय्यद लतिफ यांनी मुखेड येथे गेले. आपला मुलगा गायब असल्याचे मुखेड पोलीसांना सांगितले तेव्हा मुखेड पोलिसांनी गडगा जवळ एक युवकाचे प्रेत सापडले आहे असे सांगितले आणि त्यांना फोटो दाखवले. फोटो पाहून सय्यद लतीफला हा आपलाच मुलगा असल्यास ते वाटू लागले. म्हणून त्यांनी नायगावला जाऊन प्रेत पाहिले तेव्हा तो त्यांचाच मुलगा सय्यद जिशान होता. त्यानंतर सय्यद लतीफ यांनी दिलेल्या तक्रारीवरून शेख अब्बास शेख रमजानसाब याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नायगाव पोलीसां कडून शेख अब्बासला अटक करण्यात आली आहे.हा घटनाक्रम शेख अब्बासला शंका होती की सय्यद जीशान माझ्या पत्नीकडे वाईट नजरेने पाहतो म्हणूनच घडलेला आहे, असे सांगण्यात आले आहे.
