नांदेड(प्रतिनिधी)-18 वर्ष 10 महिन्याची मुलगी हदगाव पोलीस ठाण्यात हजर होवून आपला जबाब दिल्यानंतर या प्रकरणात त्या बालिकेने दिलेल्या जबाबानुसार ती अल्पवयीन असतांना तिला पळवून नेणाऱ्या 32 वर्षीय व्यक्तीला अटक झाली आणि आज अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.एम.शिंदे यांनी त्या प्रकरणातील व्यक्तीला 5 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि.18 मार्च 2025 रोजी एका अल्पवयीन बालिकेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार हदगाव पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 363 प्रमाणे गुन्हा क्रमांक 56/2023 दाखल झाला होता. ती बालिका 30 सप्टेंबर 2025 रोजी पोलीस ठाणे हदगाव येथे हजर झाली. तिचे आज वय 18 वर्ष 10 महिने आहे. पण तिला भागवत उर्फ भगवान नारायण गिरी (32) या हिंगोली जिल्ह्यातील व्यक्तीने पळवून नेले होते. पुढे ते नागपूर,पुणे येथे राहिले. पण त्या बालिकेने 30 सप्टेंबर रोजी दिलेल्या तक्रारीनुसार या गुन्ह्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 376(2)(आय), 376(2)(एन) आणि सोबत लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012(पोक्सो)ेच्या कलम 4, 6,8 आणि 12 वाढल्या.
आज पोलीस उपनिरिक्षक एम.एस.बेंबडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अटक असलेल्या भागवत उर्फ भगवान नारायण गिरीला नांदेड अतिरिक्त न्यायाधीशांसमोर हजर केले. या गुन्ह्याच्या तपासाच्या प्रगतीसाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचा मुद्दा सरकारी वकील ऍड. एम.ए.बत्तुल्ला (डांगे) यांनी मांडला. न्यायाधीश आर.एम.शिंदे भागवत गिरीला 5 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
न्यायालयात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये या प्रकरणात एक नवीनच प्रकार दिसला. पीसीआर पुर्ण करतांना लिहिणारा अधिकारी आपल्या पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याचे पद लिहुन त्यांच्या मार्फतीने असे लिहिले जाते. ही प्रथा आहे. आजच्या या पीसीआर यादीमध्ये सादरकर्ता अधिकाऱ्याने मा.सहायय्क पोलीस निरिक्षक साहेब पोलीस ठाणे हदगाव असे टाईप केलेले होते. त्यावर ज्या अधिकाऱ्याने स्वाक्षरी केली. त्या स्वाक्षरीखाली पोलीस निरिक्षक पोलीस ठाणे हदगाव असा शिक्का मारलेला होता. हदगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी पद सहाय्यक पोलीस निरिक्षक संकेत दिघे यांच्याकडे आहे. मग त्यांच्याकडे पद असतांना त्यांनी शिक्का मात्र पोलीस निरिक्षक असा लावून त्यावर स्वाक्षरी केली आहे. हदगाव पोलीस ठाण्यात पोलीस निरिक्षकच नाहीत.
पोक्सो प्रकरणात 32 वर्षीय व्यक्तीला तीन दिवस पोलीस कोठडी
