नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड विमानतळावर लोकशाही पध्दतीने पोलीसींग चालत नसून राजशाही पध्दतीने चालत आहे. 2018 पासून नियुक्तीस असलेला पोलीस अंमलदार त्या ठिकाणी आज हजेरी मेजर आहे. चार वेळा बदली झाल्यानंतर सुध्दा तो बदलीवर जात नाही. हा प्रकार फक्त विमानतळ येथेच सुरू आहे असे नाही. नांदेड जिल्ह्यातील अनेक पोलीस घटकांमध्ये असे पोलीस अंमलदार आहेत. जे नियुक्ती एका जागी आणि काम दुसऱ्या जागीच करतात. यामुळे पोलीस दलामध्ये नाराजी सुर ऐकायला मिळत आहे.
नांदेड विमानतळावर पोलीस अंमलदार दिपक दत्तात्रय क्षीरसागर बकल नंबर 3146 यांची नियुक्ती सन 2018 मध्ये झाली. चार वर्षानंतर झालेल्या बदलीला त्यांनी 2022 मध्ये स्थगिती मिळवली. त्यानंतर प्रत्येक वर्षी त्यांची बदली झालेली आहे. 2025 मध्ये त्यांची बदली पोलीस ठाणे वजिराबाद येथे झाली. पण ते आजही विमानतळावरच कार्यरत आहेत. दिपक क्षीरसागर यांच्याकडे हजेरी मेजरचा पदभार आहे. मुळात हे पद अत्यंत जबाबदारीचे आणि महत्वाचे आहे. पण याचा वापर हजेरी मेजर वेगवेगळ्या पध्दतीने करतात आणि असाच काहीसा प्रकार विमानतळात सुरु आहे.
विमानतळात एक पोलीस निरिक्षक, एक सहाय्यक पोलीस निरिक्षक, दोन पोलीस उपनिरिक्षक यांच्यासह एकूण 57 मनुष्यबळाची मान्यता आहे. पण तेथे प्रत्यक्षा 37 जण काम करतात. विमानतळावर ज्यांची नियुक्ती होते. त्यांच्यासाठी इंडक्शन हे प्रशिक्षण पुर्ण करणे आवश्यक आहे. पण किती अधिकारी आणि किती पोलीस अंमलदार हे इंडक्शन प्रशिक्षण पास आहेत की, नापास आहेत याची माहिती प्राप्त झाली नाही.
दिपक क्षीरसागर जो प्रकार तेथे घडवितात ते राज्याच्या एका मंत्र्याचे नाव घेवून इतरांना सांगत असतात की, तो माझा पाहुणा आहे. यामुळे ऐकणाऱ्यांना वेगळीच भिती वाटायला लागते. ऐकणारे काही सर्वसाधारण माणुस नाहीत. ते पण पोलीसच आहेत. मग पोलीसांनाच भिती वाटत असेल तर मग इतरांचे काय?
हा प्रकार विमानतळ पोलीस ठाण्यातच आहे असे नाही. नांदेड जिल्हा पोलीस दलामध्ये 36 पोलीस ठाणे, पोलीस मुख्यालय, पोलीस अधिक्षक कार्यालयातील विविध विभाग यामध्ये सुध्दा काम करणारे अनेक पोलीस अंमलदार नियुक्ती एका ठिकाणी आणि काम दुसऱ्याच ठिकाणी. पोलीस अधिक्षक कार्यालयात तर काही पोलीस अंमलदार असे आहेत. ज्यांना पुन्हा-पुन्हा एकाच विभागात नियुक्ती मिळत आहे. किंबहुना काही पोलीस अंमलदार असे सुध्दा आहेत की, जेंव्हापासून ते पोलीस झाले आहेत. तेंव्हापासून त्यांनी पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या बाहेर नोकरीच केलेली नाही. या एकंदरीत सर्व घटनाक्रमाबद्दल पोलीस दलातूनच नाराजीचा सुर ऐकावयाला मिळत आहे.
2018 पासून विमानतळात कार्यरत असलेला पोलीस आजही बदलला नाही
