नांदेड–राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० याविषयी राष्ट्रीय सेवा योजना काम करावे आणि विद्यार्थ्यांना पालकांना समजून सांगावे, तसेच स्वयंसेवकांनी आपत्ती निवारणासाठी पुढाकार घ्यावा, असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाची वार्षिक नियोजन बैठकीत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी व्यक्त केले.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या बैठकीस प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. डी. डी. पवार, अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत बाविस्कर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे, वित्त व लेखा अधिकारी डॉ. पराग भालचंद्र, क्रीडा संचालक डॉ. भास्कर माने, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. मारोती गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे ते म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजना मधून स्टार्टअप निर्मिती करण्यात यावी, पर्यावरणपूरक उपक्रम – कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक पुनर्वापर, सौर ऊर्जा उपकरणे ग्रामीण विकास व शेती – ड्रिप सिंचन तंत्रज्ञान, शेती उपयोगी ड्रोन सेवा, कृषी-प्रक्रिया उद्योग. आरोग्य आणि स्वच्छता – कमी खर्चिक स्वच्छता उत्पादने, डिजिटल हेल्थ अॅषप्स, ग्रामीण भागासाठी हेल्थ किट्स. शैक्षणिक स्टार्टअप्स – डिजिटल लायब्ररी, ऑनलाईन कौशल्य प्रशिक्षण, मोबाईल अॅहपद्वारे अभ्याससाहित्य महिला व स्वयं-सहाय्यता गट – घरगुती उत्पादनांना ब्रँडिंग व ऑनलाईन मार्केटिंग. सोशल इनोव्हेशन – गरजूंसाठी सेकंड-हँड वस्तूंचे अॅतप, स्थानिक समस्यांसाठी तंत्रज्ञानाधारित उपाय. समस्या ओळखण्याची संधी – शिबिरांमधून थेट ग्रामीण/शहरी समाजाशी संपर्क टीमवर्क व नेतृत्व – स्वयंसेवकांमधील गटकार्य आणि नेतृत्त्वगुण उद्योजकतेसाठी उपयोगी. कौशल्य विकास – संवादकौशल्य, डिजिटल कौशल्य, प्रकल्प व्यवस्थापन संशोधन व नवोपक्रम – समाजातील वास्तव समस्यांचे शास्त्रीय विश्लेषण करून त्यावर सकारात्मक कार्य करावे असे आवाहन यावेळी केले.
या बैठकीच्या प्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांनी मार्गदर्शन करताना म्हटले की, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता जोपासली जावी राष्ट्रभक्ती आणि समाजसेवेचे वृत्त हाती घेऊन काम करावे असे आवाहन केले.
यावेळी जिल्हा समन्वयक म्हणून निवड झालेले डॉ. भागवत पस्तापुरे (नांदेड), डॉ. बालाजी होकरणे (लातूर), डॉ. पांडुरंग धोंडगे (परभणी), डॉ. पवन वासनिक (हिंगोली) यांचा कुलगुरू महोदय यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या बैठकीचे प्रस्ताविक रासेयो संचालक डॉ. मारोती गायकवाड यांनी तर सूत्रसंचालन डॉ. केशव आलगुले यांनी केले. या बैठकीच्या यशस्वीतेसाठी रासेयो विभागातील कर्मचारी ए. आय. शेख, तुकाराम हंबर्डे, युसुफ पठाण, स्वयंसेविका अंजली वं वैष्णवी यांनी परिश्रम घेतले.
