नांदेड(प्रतिनिधी)-काही दिवसापुर्वीच नांदेड शहरात एका सामाजिक विषयाच्या अनुरूप तसेच समाजाच्या मागणी विषयाने एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. याचा मोर्चामध्ये जिल्हाभरातून समाज बांधव सहभागी झाले होते. पण काही पत्रकारांनी या सामाजिक कामात सुध्दा पैशांची उकळ केली. म्हणजे पत्रकारीतेचा स्तर किती खालच्या स्तराला गेला आहे हे दिसते. पत्रकारांना पैसे देण्यासाठीची यादी तयार करणारा लोकशाहीचा आधार स्तंभ असतांना त्याने वास्तव न्युज लाईव्हचे नाव सुध्दा त्या यादीत लिहिले होते. त्या भडव्याला कधी वास्तव न्युज लाईव्हने आम्हाला पैसे मिळवून दे असे सांगितले नव्हते की, त्या हारामखोराने दाखवून द्यावे की वास्तव न्युज लाईव्हने कोणाकडून पैसे घेतले आहेत.असे म्हणणारा एखादा जरी माणुस असेल तरी आम्ही आमच्या पत्रकारीतेला तिलांजली देवू. सत्य असेल तर पण.
काही दिवसांपुर्वी अनेक वर्षांपासून बहुदा हजारो वर्षापासून ज्या समाजाचे अस्तित्व आहे. परंतू त्यांना शासकीय स्तरावर नेहमीच डावलले गेले. अशा समाजाच्यावतीने आपल्या मागण्यांसाठी एक महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात नांदेड जिल्ह्यातील हजारोच्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते. कोणत्याही समारंभासाठी, एकत्रीकरणासाठी एक नियोजनाची गरज असते आणि तशी नियोजन करण्याची तयारी याही समाजाने केली होती. पण दुर्देवी बाब अशी वाटते की, ज्या समाजाला आपल्या हक्कासाठी, आपल्याकडे झालेल्या दुर्लक्षाकडे शासनाचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी या महामोर्चाचे आयोजन करावे लागले होते. पण यामध्ये आयोजकांनी सुध्दा कोण्या एका उपटसुंभाकडून पत्रकारांची यादी मागितली. इतपर्यंत ठिक आहे. कारण आयोजकांना सर्वच पत्रकारांची ओळख असते असे नसते. त्यामुळे या आयोजनासाठी सर्व पत्रकारांचे क्रमांक त्यांच्याकडे असणे आवश्यक होते आणि या उपट सुंभाने दिलेल्या यादीप्रमाणे पत्रकारांना आयोजकांनी पैसे सुध्दा दिले. आमचा प्रश्न असा आहे की, सामाजिक कामासाठी आयोजकांना पैसे देण्याची गरज काय आहे. ते काम तुमच्या स्वत:चे व्यक्तीगत असेल तर पैसे देणे सुध्दा मान्य करू. पण आमच्यासाठी नाही. पण सामाजिक कामात तर नक्कीच ते मान्य करणार नाही आणि सामाजिक कामांच्या बातम्यांना प्रसिध्द न देणारे जे पत्रकार असतील तर ते पत्रकार नव्हेत तर नुसते भांड आहेत. अशा लोकांना आयोजकांनी पैसे द्यावे याचेही दु:ख वाटले.
ज्या भडव्याने ही यादी आयोजकांकडे दिली. त्यात कोणाला पैसे मिळाले आणि कोणाला नाही मिळाले. याच्या वादात आम्हाला जायचे नाही. पण सर्वात दु:ख दायक घटनाक्रम असा आहे की, यादीमध्ये क्रमांक 15 वर वास्तव न्युज लाईव्हचे नाव सुध्दा लिहिलेले आहे. आम्ही या हरामखोरला कधी पैसे कमावून देण्याची मागणी केली नाही. आमचे तर या भिकाऱ्याला आव्हान आहे की, आम्ही कोणाकडून पैसे घेतले असा एक तरी माणुस तो पण सत्य सांगणारा तयार केलेला नाही. आमच्या समोर उभा करावा आम्ही आमच्या पत्रकारीतेला त्या क्षणीच तिलांजली देवून टाकू. आम्ही Only For Truth यासाठी पत्रकारीता स्विकारलेली आहे. अनेक रस्त्यावरची माणसे आम्ही तयार केली आहेत. जी आज वातानुकुलीत वाहनांमध्ये फिरत आहेत. आम्हाला त्याचे दु:ख नाही पण आमचे नाव यादीत देणाऱ्याने कमीत कमी पुढच्या वेळेस तरी याचे भान ठेवावे नसता आम्हाला लेखणी सोडून दुसऱ्या पध्दतीने उत्तर देण्याची पाळी येईल.
हा घटनाक्रम 28 स्पटेंबर रोजी घडलेला आहे आणि ज्या ठिकाणी घडला त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. आम्ही ते सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करण्याचा प्रयत्न करत आहोत. ते उपलब्ध झाल्यास आम्ही ते सीसीटीव्ही फुटेज सुध्दा बातमीसोबत जोडून पुन्हा प्रसिध्द करणारच आहोत. यावरून हे स्पष्ट होते की, महामोर्चाच्या आयोजकांच्या घरी एक दिवसाअगोदरपासून का चकरा मारल्या. यामध्ये नक्कीच काही तरी खलबत आहे हे दिसते. सोबतच ज्या दिवशी हा मोर्चा होता त्या दिवशी हा उपटसुंभ नांदेडमध्येच उपस्थित नव्हता. आयोजकांनी सुध्दा याची दखल घेण्याची गरज आहे. कोणत्या कुत्रांना विचारून तुम्ही हा डाव खेळला हे आता उघड झाले आहे.
भडव्या पत्रकाराने वास्तव न्युज लाईव्हचे नाव सुध्दा पैसे घेणाऱ्यांच्या यादीत टाकले
