नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातून 2 श्रेणी पोलीस उपनिरिक्षक आणि एक पोलीस अंमलदार आज सेवा निवृत्त झाले. पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप आणि पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी त्यांना सेवानिवृत्तीनंतरचा कालखंड सुख समाधान, आरोग्यदायी जावे अशा शुभकामना दिल्या.

आज नांदेड जिल्हा पोलीस दलातून श्रेणी पोलीस उपनिरिक्षक सुर्यभान दिगंबर कागणे-नियंत्रण कक्ष नांदेड, श्रेणी चालक पोलीस उपनिरिक्षक केशव विश्र्वनाथ चाटे-गुरुद्वारा सुरक्षा पथक, पोलीस अंमलदार दत्ता जयवंत गिते-पोलीस ठाणे लोहा यांनी आपला विहित सेवाकालखंड पुर्ण केल्यानंतर त्यांना सेवानिवृत्ती निरोप देण्यात आला. याप्रसंगी त्यांचा सहकुटूंब सन्मान करण्यात आला. पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ आणि भेट वस्तु देवून त्यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात पोलीस उपअधिक्षक मुख्यालय डॉ.अश्र्विनी जगताप, पोलीस कल्याण विभागाचे पोलीस निरिक्षक जगदीश मंडलवार, जनसंपर्क अधिकारी पोलीस उपनिरिक्षक ज.ए.गायकवाड यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पोलीस अंमलदार रुक्मीण कानगुले यांनी केले. जनसंपर्क विभागातील पोलीस अंमलदार मारोती कांबळे, रविंद्र राठोड आणि पोलीस कल्याण विभागातील सविता भिमलवाड यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. याप्रसंगी दैनिक सामनाचे जिल्हाप्रतिनिधी विजय जोशी, गोदातीरचे प्रल्हाद कांबळे यांनी सुध्दा सुर्यभान कागणे यांना सेवानिवृत्तीच्यानंतरच्या जीवनासाठी शुभकामना प्रेषित केल्या.

