नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड, परभणी, लातूर, हिंगोलीचा काही भाग आणि बीड जिल्हा या भागांमध्ये पाऊस आणि पुराने घातलेले थैमान थांबायचे काही नाव घेत नाही. आता बातमी लिहिण्याच्या काही वेळ आगोदर नांदेड शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीची पातळी 357 मिटर झाली आहे. जायकवाडी धरणातील 29 दारे आज दुपारी 1 वाजेच्यासुमारास उघडण्यात आली आहेत. त्यातून 6 लाख क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. तो विसर्ग नांदेडला पोहचण्यासाठी 48 तास लागतात आणि पाऊस काही थांबायचे नाव घेतच नाही. म्हणून आता देवालाच धन्यवाद देत आमची जिरली रे बाबा आता असेच म्हणण्याची वेळ आली आहे.
आताच्या परिस्थितीत नांदेड शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीची पातळी 357 मिटरवर आहे. धोक्याच्या पातळीपेक्षा 6 मिटर उंच नदी फुगली आहे. याचे कारण स्पष्ट आहे की, पाऊस पडत आहे आणि शहरातील पाणी नदी आपल्यामध्ये सामावून घेत नाही म्हणून हा पाण्याचा फुगवटा झाला आहे. जायकवाडी धरणाचे 29 दरवाजे 5 ते 6 फुट उंचीने आज दुपारी 1 वाजेच्यासुमारास उघडण्यात आले आहेत. त्यातून 6 लाख क्युसेक्स एवढा विसर्ग सुरू आहे. हा पाणी विसर्ग विष्णुपूरी प्रकल्पात 48 तासात पोहचतो. नांदेडमध्ये सध्या पाणी सुरूच आहे. म्हणजे विष्णुुपुरीची सुरू असलेली 16 दारे बंद होण्याची काही चिन्हे दिसत नाहीत. म्हणून आता देवाकडेच विनंती आहे की, धन्यवाद बाबा आता आमची जिरली रे…
इकडे नेते मंडळी पाहणी दौरे करून बातम्या पाठवत आहेत. परंतू प्रत्यक्षात पुर पिडीतांना काय मदत मिळत आहे हे देवच जाणे. आकडा तर भला मोठा जारी करण्यात आला आहे. झालेले नुकसान आणि मिळणारी मदत याचा ताळमेळ कोठे दिसतो आहे काय? हा प्रश्न आहे. काही प्रशासनिक अधिकारी निवारा दिलेल्या दोन-चार जागी जावून विचारणा केल्याच्या वेगळ्या बातम्या तयार होत आहेत. बातम्या तयार करणे हे पत्रकारांचे कामच आहेत. परंतू पाहणी दौरे, विसावा दिलेल्या ठिकाणच्या भेटी या बातम्यांमध्ये काय रस आहे . तेंव्हा प्रशासनाने आपल्या मनाने आम्हाला मदत करावी अशी पुर पिडीतांची मागणी आहे.
आजही शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेले आहे. या पाण्यातूनच लोकांना दररोजच्या कामांवर ये-जा करावी लागत आहे. रस्त्यावर पाणी असल्याने रस्त्याच्या खाली काय झाले असेल हे दिसणे अशक्य झाले आहे. परंतू कामावर जाणे सुध्दा गरजेचे आहे. अशा परिस्थितीत पुन्हा दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही. ज्या लोकांना जाणे-येणे गरजेचे आहे. त्यांनी घरातच बसून राहणे अशक्य आहे. म्हणूनच वास्तव न्युज लाईव्ह आता देवालाच विनंती करत आहे. जिल्ह्यात सुध्दा अनेक गावांचा संपर्क अद्यापही तुटलेलाच आहे. त्याला कोणताही पर्याय उपलब्ध झालेले नाही. तेंव्हा वास्तव न्युज लाईव्ह जनतेला सुध्दा आवाहन करत आहे की, पुर परिस्थितीत कमीत कमी प्रवास कसा करता येईल यासाठी प्रयत्न करावा.
संबंधित व्हिडिओ..
