नांदेड(प्रतिनिधी) -आईला मारहाण केली म्हणून मोठ्या भावाने छोट्या भावाचा खून केल्याचा प्रकार मौजे किवळा ता.लोहा येथे घडला आहे. सोनखेड पोलीसांनी अत्यंत त्वरीत प्रभावाने अज्ञात मारेकऱ्याला शोधून काढले.
दि.25 सप्टेंबर रोजी रात्री 10 ते 26 सप्टेंबरच्या पहाटे 7 वाजेदरम्यान मौजे किवळा येथे शामराव वसंतराव देशमुख (हंबर्डे) यांचा अज्ञात मारेकऱ्यांनी अज्ञात कारणासाठी खून केल्याची तक्रार वसंत बालाजी देशमुख (हंबर्डे) यांनी दिली. सोनखेड पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 225/2025 दाखल केला. सुतावरून स्वर्ग गाठण्याची तयारी ठेवणाऱ्या पोलीसांनी काही तासातच हा खून मयत शामराव वसंतराव देशमुखचा मोठा भाऊ सचिन वसंतराव देशमुख (27) याने केल्याचे शोधले. ही कबुली सचिननेच दिली. सचिन सांगत होता की, मयत शामरावने अर्थात त्याच्या लहान भावाने त्याच्या आईला मारहाण केल्यामुळे त्याला राग आला होता आणि या रागात त्याने झोपलेल्या अवस्थेत चाकूचे वार करून त्याचा खून केला.
पोलीस उपअधिक्षक प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनात सोखेडचे सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने, पोलीस उपनिरिक्षक वैशाली कांबळे, पोलीस अंमलदार गणपत गिते, वामन नागरगोजे, विश्र्वनाथ हंबर्डे, केशव मुंडकर, उत्तम देवकत्ते, नामदेव रेजितवाड, रामेश्र्वर आलेवाड, रमेश वाघमारे, दिगंबर कवाळे, दिपक ओढणे यांनी या गुन्ह्याची उकल केली.
आईला मारहाण करणाऱ्या छोट्या भावाचा खून मोठ्या भावाने केला
