नांदेड(प्रतिनिधी)-एका व्यक्तीकडून 3 एकर 31 गुंठे शेतीची सौदाचिठ्ठी करून दोन जणांनी ती जमीन दुसऱ्याला विकून त्याला 8 ते 10 लाख रुपयांना फसवल्याचा प्रकार लोहा दुय्यम निबंधक कार्यालयात घडला आहे.
शेख युनूस शेख मैनोद्दीन रा.शिवकल्याणनगर लोहा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 24 जून 2025 रोजी कुणाल गौतम खरात रा.नारळी बाग छत्रपती संभाजीनगर आणि शिवाजी पंडीतराव जोगदंड रा.बीड यांनी संगणमत करून मौजे नांदगाव येथे असलेली त्यांची 3 एकर 31 गुंठे शेत जमीन सौदाचिठ्ठी द्वारे शेख युनूस यांना लिहुन दिली. या जमीनीची नोंदणी न करता ती परस्पर दुसऱ्यांना विक्री केली. त्यामुळे माझी 8 ते 10 लाखांना फसवणूक झाली आहे. लोहा पोलीसांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 303/2025 प्रमाणे दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक पांचाळ अधिक तपास करीत आहे.
3 एकरची सौदाचिठ्ठी करून दिली मात्र जागा दुसऱ्यालाच विकली
