नांदेड(प्रतिनिधी)-मेड इन पाकिस्तान लिहिलेले कॉसमेटिक साहित्य आपल्या दुकानात विक्रीसाठी ठेवलेल्या दोन जणांविरुध्द फसवणूक आणि औषधी द्रव्य अधिनियम या कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अंमलदार शेख इजराईल शेख युसूफ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांना मिळालेल्या माहितीनुसार 25 सप्टेंबर रोजी मन्यार गल्ली भागात मोहम्मद जियाउद्दीन मोहम्मद वाजीद (24) यांच्या मन्यारगल्ली भागातील दुकानावर तसेच इफ्तेखार खान आरीफ खान (32) यांच्या चौफाळा भागातील दुकानाची चौकशी केली असता वैद्यकीय परवाना नसतांना स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी मेड इन पाकिस्तान असे लिहिलेले बनावट सौंदर्य प्रसादन साहित्य 30 हजार 680 रुपयांचे विक्री करण्यासाठी ठेवलेले होते. ते जप्त करून दोघांविरुध्द इतवारा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि औषधी द्रव्य व सौंदर्य प्रसाधन अधिनियम कायदा 1940 प्रमाणे गुन्हा क्रमांक 304/2025 दाखल करण्यात आला असून पोलीस अंमलदार बबन बेडदे अधिक तपास करीत आहेत.
मेड इन पाकिस्तान सौंदर्य प्रसाधने विकणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल
