माणसाची मूळ प्रेरणा काय ? हतबलता की आशावाद?

 

कोण म्हणतो आभाळाला भोक पाडता येत नाही? पण त्यासाठी एक….

सगळा समाज हतबल असतो का? सेलिंगमनच्या प्रयोगातील कुत्र्याप्रमाणे सगळीच माणसं सगळा काळ शॉक खाणं पसंत करतात का? त्याबद्दलचा एक प्रयोग पाहूया.

एका होस्टेलमध्ये अनेक प्रकारचे लोक राहत होते. प्रत्येक खोलीमध्ये एक बटन होते. ते कधीही व कोणत्याही वेळी वाजत असे. त्याच्या आवाजाने लोकांना त्रास होई. पण शेजारचे बटन दाबले की तो आवाज बंद करता येई. त्रासलेले लोक व्यक्तिशः व्यवस्थापकाकडे तक्रार करीत. अनेकदा जनरल मीटिंग घेऊन लेखी तक्रार व्यवस्थापकाकडे केली.यापुढे आवाज होणार नाही असे उत्तर देऊन व्यवस्थापक वेळ मारून नेई .पण तो प्रयोगच असल्याने पुन्हा पुन्हा अवेळी त्रासदायक आवाज येई. वारंवार तक्रार करूनही काही फरक पडत नाही हे दिसल्यावर बहुतेकांनी कालांतराने तक्रार करायची सोडून दिले. शिवाय एवढे स्वस्त हॉटेल दुसरीकडे नव्हते त्यामुळे ते सोडून जाण्याचे धाडसही कुणी केले नाही. त्यांनी त्रासदायक आवाज सहन करीत तिथेच राहायचे ठरवले. पण काही मोजक्या लोकांनी हार मानली नाही. वारंवार होणारा त्रास बंद व्हावा म्हणून हतबल न होता पिच्छा पुरवून व्यवस्थापकास जेरीस आणले होते. इतके की शेवटी त्या व्यवस्थापकाला तो आवाज बंद करावा लागला.या वर्तनुकीला शास्त्रज्ञांनी ’learned optimism’ अंगवळणी पडलेला आशावाद असे संबोधले. वंचितांचे हक्क मिळविताना व शोषणाविरुद्ध लढताना बरीच माणसं हतबलता helplessness अंगीकारतात. तसेच काही माणसे आशावाद अंगीकारतात व सतत संघर्ष करीत राहतात. सामान्य माणसाच्या जीवनाची प्रत व जीवनमानाचा दर्जा सुधारण्यासाठी मोजके लोक धडपडत असतात. माहितीचा अधिकार, शेतकरी विरोधी कायदे मागे घेणे, राळेगण शिंदी, हिवरे बाजार सारखे असंख्य ग्राम सुधारणेचे प्रयोग. जातीय व वांशिक दंगली समूळ नष्ट करण्याचा आम्ही भिवंडी पोलिसांनी राबविलेला मोहल्ला कमिटी असे असंख्य प्रयोग या मागे दुर्दम्य आशावाद optimism आहे. पप्पू पप्पू म्हणून ज्याचा गेले अनेक वर्ष उल्लेख होतो त्यानेच आपण पप्पू नसून पप्पा आहोत हे सिद्ध केलेले आपल्याला पाहायला मिळते.

इथली ब्राह्मणी व्यवस्था या देशाच्या अधोगतीचे मूळ कारण आहे.ती व्यवस्था उलथून टाकण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे मी म्हणतो तेंव्हा अनेक जण मला ट्रोल करतात व म्हणतात की तुम्ही या ब्राह्मणी व्यवस्थेचे काय वाकडे करणार? त्यावेळी मला आवडलेला दुष्यंत कुमारचा शेर त्यांना सांगू इच्छितो.” कौन कहता है की आसमान मे सुराख नहीं हो शकता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो l

(कोण म्हणतो आभाळाला छिद्र पाडता येत नाही. एक तरी दगड जीव ओतून आकाशाकडे फेकून पहा मित्रा!)

आशावाद ही मानवी मूळ प्रवृत्ती आहे. आशावादाचा आतला आवाज प्रत्येक मानवाला असतो. तो ऐकायला येतो पण तो हळू व हलका असतो . म्हणून त्याला दाबता ही सहज येत असावे!

तरीपण सेलीगमनस डॉग या प्रयोगातील कुत्र्याप्रमाणे हतबल होऊन आयुष्यभर शॉक खात जगण्याऐवजी अन्याय करणारा विरुद्ध आवाज उठवून त्याला धडा शिकवण्याची क्षमता प्रत्येक भारतीय मध्ये आहे. ती क्षमता काहीजण दाबून टाकतात तर काहीजण जीव ओतून त्याचा वापर करतात हे मला समजलेले वास्तव आहे. ही ब्राह्मणी व्यवस्था उलथून टाकण्यासाठी आपणास नक्कीच यश येऊ शकते.

यश येईल! याची मला खात्री आहे.

– सुरेश खोपडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!