नांदेड(प्रतिनिधी)-उस्माननगर पोलीसांनी तिन दिवसांमध्ये अटक वॉरंट जारी असलेल्या दहा गुन्हेगारांना पकडून न्यायालयासमक्ष हजर केल्याची कार्यवाही केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार 23, 24 आणि 25 सप्टेंबर रोजी उस्माननगर पोलीसांनी बालाजी हानवंता जाधव (52), मोहन बालाजी जाधव(33), रमेश बालाजी जाधव(27) सर्व रा.हातणी ता.लोहा, रामदास दत्तराम भरकडे (45) रा.नांदगाव ता.लोहा, तानाजी बालाजी येडे (36) रा.मारतळा ता.लोहा, गंगाधर बालाजी खंडगावे रा.वर्ताळा ता.मुखेड, हमीद फकीरसाब कुरेशी (68), मकबुल रसुलसाब कुरेशी(28) दोघे रा.साठेनगर कंधार, नागनाथ संभाराम रामशेटेवाड (34), गितेश गंगाधर रामशेटवाड(32) दोघे रा.हाळदा ता.कंधार या दहा जणांना पकडले. त्यांच्याविरुध्द न्यायालयाने अटक वॉरंट जारी केलेले होते. पुढील कार्यवाहीसाठी त्यांना न्यायालयासमक्ष हजर करण्यात आले.
उपविभाग कंधारच्या पोलीस अधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनात उस्माननगरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय निलपत्रेवार, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक एम.एम.मकदुम, पोलीस अंमलदार गंगाधर चिंचोरे, बळवंत कांबळे, तुकाराम जुन्ने, प्रकाश पद्देवाड यांनी ही कार्यवाही केली.
अटक वॉरंट असलेले दहा आरोपी उस्माननगर पोलीसांनी तीन दिवसात पकडले
