नांदेड(प्रतिनिधी)- नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेतील सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे यांनी तिन चोरट्यांना पकडून आठ गुन्ह्याची उकल केली आहे. त्यांच्याकडून 7 लाख 28 हजार 339 रुपयंाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार 25 सप्टेंबर रोजी सहाय्यक पोलीस रवि वाहुळे, श्रेणी पोलीस उपनिरिक्षक बळीराम दासरे, पोलीस अंमलदार मिलिंद नरबाग, सिध्दार्थ सोनसळे, शितल सोळंके, दिपक ओढणे, रेश्मा पठाण, शुभांगी जाधव आणि कांचन कसबे हे गस्त करत असतांना त्यांनी चिखलवाडी परिसरातील एका घरात चोरटे आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना ताब्यात घेतले. त्यांची नावे मंगल ज्ञानेश्र्वर चव्हाण (26) रा.गौतमनगर सांगवी ह.मु.पुणेगाव जि.जालना, श्रीनिवास शिवाजी चव्हाण (26) आणि प्रताप गब्बरसिंघ राठोड (20) दोघे रा.सोनाली ता.हिमायतनगर अशी आहेत. या चोरट्यांकडून 61 ग्रॅम सोन्याचे दागिणे व 270 ग्रॅम चांदीचे दागिणे असा 7 लाख 28 हजार 339 रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. या चोरट्यांनी लोहा, नायगाव-2, कुंटूर, लिंबगाव, बारड, कुंडलवाडी आणि देगलूर अशा 8 पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे गुन्हे केले आहेत.
स्थानिक गुन्हा शाखेने तीन चोरटे पकडून 7 लाख 28 हजारांचा मुद्देमाल जप्त केला; आठ गुन्हे उघडकीस
