नांदेड(प्रतिनिधी)-हमाली करणाऱ्या वडीलांच्या घरात जन्मलेल्या सात आपत्यांपैकी सर्वाधिक 12 वी पर्यंतचे शिक्षण घेवून पोलीस उपनिरिक्षक सुनिल सुर्यवंशी 1991 मध्ये पोलीस शिपाई या पदावर नांदेड जिल्हा पोलीस दलात सहभागी झाले. या महिन्यात त्यांना पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी त्यांना पोलीस उपनिरिक्षक पद बहाल केले आहे. या बद्दल ते पोलीस अधिक्षकांचे धन्यवाद व्यक्त करतात.
12 सप्टेंबर 1971 रोजी मारोतीराव सुर्यवंशी यांच्या कुटूंबात सुनिल यांचा जन्म झाला. त्यांना एकून 3 भाऊ, 3 बहिणीसुध्दा आहेत. त्यांचे वडील मारोतराव त्याकाळी प्रसिध्द असलेल्या मुदखेड येथील मोंढा बाजारात हमाली करत होते. दुर्देवाने त्यांचे निधन 2006 मध्ये झाले आहे. सुनिल सुर्यवंशी यांच्या आई आज 104 वर्षांच्या आहेत. सुनिल सुर्यवंशी यांना 1991 मध्ये नांदेड जिल्हा पोलीस दलात प्रवेश मिळाला. मुख्यालय, उमरी, एलसीबी, वजिराबाद, बारड, हदगाव, भोकर, तामसा आणि आज पुन्हा उमरी असा त्यांनी पोलीस दलातील 30 वर्षाचा प्रवास करतांना जवळपास 200 बक्षीसे प्राप्त केली आहेत. सुनिल सुर्यवंशी यांचे दोन पुत्र आहेत. एक डॉक्टर आहे आणि एक बॅंकेत मॅनेजर आहे. 30 वर्षाच्या सेवेनंतर त्यांना पोलीस उपनिरिक्षक पद या महिन्यातच प्राप्त झाले.
सुनिल सुर्यवंशी यांची ख्याती अशी आहे की, पोलीस सेवा करत असतांना त्यांनी आपली पोलीस सेवा पुर्ण करून शेतात काम करत आपले जीवन चालविले. माझ्या शेतात काम आहे म्हणून आपल्या प्रभारी अधिकाऱ्याला जास्तीची सवलत कधी मागितली नाही आणि शेतात काम करून थकलो आहे असे म्हणून कधीच नोकरीवर उशीरा गेले नाहीत. त्यांना ओळखणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये एक विरळाच व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे. आज पोलीस उपनिरिक्षक झाल्यावर त्यांची नियुक्ती सध्या उमरी पोलीस ठाण्यात आहे आणि आजही ते आपल्या शेतीचे कामकाज पाहतच असतात. अशा या विरळ्या, जिगरबाज, मेहनती आणि यशस्वी पोलीस उपनिरिक्षक सुनिल सुर्यवंशी यांना भविष्यातील जीवनासाठी वास्तव न्युज लाईव्ह शुभकामना प्रेषित करत आहे.
हमालाचा मुलगा आपल्या मेहनतीने आज झाला पोलीस उपनिरिक्षक
