वन पट्टाधारक शेतकऱ्यांनी कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घ्यावा- जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत

 

नांदेड – कृषि यांत्रिकीकरण उप अभियान योजनेअंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गातील वैयक्तीक लाभधारकांना प्राधान्याने 90 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. ही योजना नांदेड जिल्ह्यात राबविण्यात येत असून, पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

 

या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह निर्धारित अर्ज शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर सादर करावा. अर्ज करताना शेतकऱ्यांनी आपली जात प्रमाणपत्र , फार्मर आयडी, आधारकार्ड व इतर आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवावीत.

जिल्ह्यातील पात्र अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी शासनाने दिलेल्या या संधीचा लाभ घेवून कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन उत्पादनक्षमता वाढवावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी तालुक्याच्या कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!