नवीन नांदेड (प्रतिनिधी)-एका कंपनीचे बनावट साहित्य विक्री करणाऱ्या एका व्यक्तीविरुध्द साहित्याचे बनावटीकरण(कॉपी राईट) कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय अशोक वंजारे हे आयपी इन्व्हेस्टीगेशन सर्व्हीस ऍन्ड डीटेक्टीव्ह सर्व्हीसमध्ये काम करतात. त्यांच्या कंपनीने बनवलेले एक्झास्ट फॅन, टेबल फॅन, सिलिंग पट्या, बॉटम पट्या विष्णुपूरीजवळी उड्डाणपुलाजवळ असलेल्या साई फु्रट व ज्युस सेंटरमध्ये विक्री करण्यासाठी ठेवल्या होत्या. दि.22 सप्टेेंबर रोजी रात्री 8.45 वाजता अक्षय वंजारे यांनी तपासणी केली. तेंव्हा हे 30 हजार 285 रुपयांचे बनावट साहित्य तेथे सापडले. या प्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण पोलीसांनी गुन्हा क्रमांक 918/2025 दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक भिसे अधिक तपास करीत आहेत.
बनावट साहित्य विकणाऱ्याविरुध्द कॉपीराईट ऍक्टचा गुन्हा दाखल
