
शिराढोण (प्रतिनिधी)- मराठवाडा हि संताची भुमी आहे त्यातिल शिराढोण ग्रामनगरी हि अध्यात्म व गुरु परंपरेचे माहेर घर म्हणुन ओळखल्या जाते गुरुपरंपरेच्या पावन स्पशार्ने पुनित झालेल्या कंधार तालुक्यातील शिराढोण येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हिमवंत केदार वैराग्य पिठाधीश्वर श्री. श्री. श्री 1008 जगदुरु भीमाशंकर लिंग शिवाचार्य महास्वामीजी शिवाचार्य रत्न श्री. ष. ब्र. प्र. षडक्षर शिवाचार्य महाराज शिराढोणकर) यांच्या दिव्य सान्निध्यात दि. 22ते 2 रोजी दरम्यान भीमाशंकर यात्रा व नवरात्र महोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये विशेष म्हणजे दि 1 ऑक्टोंबर रोज बुधवार आश्विन शुद्ध या दिवशी रात्री7 ते 10 पर्यंत भीमाशंकर मठ संस्थान येथे महाप्रसादाचा कार्यक्रम व रात्री 10 ते 1 वाजेपर्यंत अग्निकुंडा सेजारि जगद्गुरू महास्वामीजींच्या अध्यक्षतेखाली गावातील विविध स्पर्धेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. व रात्रौ 3 वाजता श्री. ब्रहामी मुहूर्त भीमाशंकर महाराजांच्या पालखीचे धगधगत्या निर्खायातून मानकरी व जंगम मंडली अग्निकुंडातून प्रवेश करतिल याचि देहि याची डोला हां अग्निकुंड प्रवेश सोहला पाहण्यासाठी भारतातिल काना कोपर्यात राहत असलेला शिराढोण येथील रहिवासी नवमिच्या दिवशि गावात दाखिल होत असतो. यात्रे निमित्त गांव भक्ति मय दिसण्यासाठि गावातिल भिमाशंकर मंदिर, परमेश्वर मंदिर, विठूलेश्वर मंदिरासह, ग्रामपंचायत वर विद्युत रोशनाई केली जाते भिमाशंकर मठ संस्थान हे काशि मठ संस्थानची स्कंद गोऋय मठ शाखा असुन काशि मठ संस्थानची मराठवाड्यातिल हि एकमेव मठ शाखा आहे. शिराढोण येथे अनेक वषार्पासून नवरात्र उत्सव व भीमाशंकर यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होत असते. या यात्रेत महाराष्ट्रासह कनार्टक, उत्तराखंड, तेलंगणा व अन्य राज्यातून श्रध्दाळू भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहून दर्शन घेतात. दरवर्षी प्रमाणे यावर्षी मोठ्या हर्षउल्लासात ही यात्रा भरविण्यात येत आहे.
