मुखेड (प्रतिनिधी)-तांदळी (ता. मुखेड) येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलाच्या मृत्यूला बिबट्याच्या हल्ल्याचे स्वरूप देत खऱ्या गुन्ह्याला दुसऱ्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या वडिलाला अखेर पोलिसांनी अटक केली आहे.
ही घटना 16 सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. मौजे तांदळी शिवारात जनार्दन उत्तम जाधव (वय 35) याचा मृतदेह आढळून आला. त्याच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. यानंतर त्याचे वडील उत्तम विठ्ठल जाधव (वय 60) यांनी मुखेड पोलिसांकडे “बिबट्याने हल्ला केला” अशी माहिती दिली.प्राथमिक माहितीनुसार, या खबरेनुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आणि प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अभिजीत तुतुरवाड यांच्याकडे सोपवण्यात आला.
