डॉ. रवींद्र कुमार सिंगल या कर्तव्यव्रती अधिकाऱ्याच्या जन्मदिनी सेवाभावी अभिवादन

वाढदिवस फक्त केक कापण्याचा नसतो,तो असतो आठवणींच्या गंधाने भारलेल्या श्वासाचा…

नांदेडच्या मातीत कार्याची बीजे रोवणाऱ्या आणि आज नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांचा वाढदिवस यंदाही नांदेडमधील त्यांच्या पोलीस अमलदारांनी आणि खाजगी व्यक्तींनी एका वेगळ्याच साजशृंगारात साजरा केला. नाते फक्त अधिकृत नव्हतं ते मनापासून जपलेलं होतं, आणि म्हणूनच या दिवसाला मिळाला तो एका “सामाजिक महोत्सवाचा” साज.

सन 2007 आणि 2008 मध्ये त्यांच्या कार्यकाळात पोलीस दलात भरती झालेले काही पोलीस अंमलदार, ज्यांचे आयुष्य त्या भरतीमुळेच नव्याने घडले, त्यांनी नेरली येथील ‘नंदनवन’ संस्थेत कुष्ठधाम व प्रौढ मतिमंद मुलांसाठी चालविल्या जाणाऱ्या सेवाभावी केंद्रात सेवा, स्नेह आणि समर्पणाच्या ओंजळी वाहिल्या.

 

या दिवशी केक नव्हता, पण होती फळं.झगमगती रोषणाई नव्हती, पण होते शंभर उन्हाळ्यांना हरवणारे चेहरे.पुष्पहार नव्हते, पण होती कृतज्ञतेची गुंफण.या उपक्रमात वजीराबाद पोलीस ठाण्यातील महिला पोलीस आमदार रणजीता सोनकांबळे, सायबर विभागातील कांचन कसबे,शिल्पा वाघमारे,नितीन केंद्रे, आकाश तरुडे,प्रितेश इटग्यालकर,रघुवीर चव्हाण,ज्ञनेश्वर कलंदर,हनुमंत कोकटवार,बालिका बरडे,देविदास जंजावले,विजय सूर्यवंशी,जना सुरेवाड,शेख शाहीन,क्रांती बंदखडके,वर्षा शिंदे,सुप्रिया बोडके,एजाज पठाण,सुकेशिनी हनमंते,अवधूत गिरी,कल्पना सोनकांबळे,शेख नजीर,अभिजित तारू,अनिता तारू,आशा गोडबोले,शेख फारुख,सयाजी कदम व इतर कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांनी नंदनवनमध्ये मुलांसाठी जेवण, शिक्षण साहित्य व फळांचे वाटप करून या दिवसाचं “कर्तृत्वमूल्य” अधोरेखित केलं.

त्याचबरोबर, नांदेडचे सामाजिक कार्यकर्ते बिरबल यादव यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करून, सामाजिकतेच्या नवपर्वाची सुरुवात केली. वाढदिवसाला त्यांनी दिलं “सजीव सन्मानाचं” रूप जे शब्दांत मावणारं नाही, अनुभवातूनच उमटणारं असतं.

 

“कधी काळी भरतीच्या माध्यमातून आम्हाला आयुष्य दिलं,

आज त्याच आठवणींनी आम्ही समाजासाठी काही देतोय…”

 

ही भावना डॉ. सिंगल यांच्या कार्यकाळातील कर्मचाऱ्यांमध्ये आजही तितकीच तेजस्वी आहे. काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमानिमित्त डॉ. सिंगल नांदेडला आले असताना, त्यांच्या नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या स्वागताला हजेरी लावून कृतज्ञतेची पताका फडकवली होती.या साऱ्या घडामोडी सिद्ध करतात की, कर्तृत्व हे नेहमीच उपस्थित नसतं, ते आठवणींच्या पायवाटांवर चालतं, समाजाच्या मनोमंदिरात दीपवत राहातं.आज नागपूरमध्ये पोलीस आयुक्त पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या या अधिकारी व्यक्तिमत्त्वाने 18 वर्षांपूर्वी नांदेडमध्ये जे पेरलं, त्याचा वटवृक्ष आजही सावली देतो आहे.

 

“वाढदिवसाची दिवाळी”

या वाढदिवसाने दिलंय एक नवं वाक्य:”वाढदिवस कसा साजरा करायचा याचा सामाजिक अर्थ असतो, व्यक्तिगत नाही.”जिथे प्रत्येक भेट म्हणजे एका संधीची आठवण,आणि प्रत्येक स्मित मागे असते ऋणानुबंधांची जपणूक.’वास्तव न्यूज लाईव्ह’ तर्फे डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!