
श्रीक्षेत्र माहूर-महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी पूर्ण पीठ असलेल्या माहूर गडावर नवरात्र उत्सवास आज दि. 22 रोजी सकाळी 7 वाजता पासुन मातृतिर्थ तलावातील मातृतिर्थ आणून अभिषेक करुन 11 वाजुन 30 मिनिटांनी घटस्थापना होऊन नवरात्र उत्सवा ला प्रारंभ झाला.असल्याने रेणुका मातेच्या गडावर भक्तांची मदीयाळी झाली.उदे ग अंबे उदे च्या गजराने मंदीर परीसर दुमदुमून गेला होता .
घटस्थापनेच्या वेळी ना.राधाकृष्ण विखे पाटील आणि ना. पंकजाताई मुंडे यांनी मातेचे दर्शन घेवुन महाआरती केली
दि 22 पासुन सुरूवात झालेल्या शारदीय नवरात्र अश्वीन शुद्ध प्रतिपदेला संबळ वाद्यांचा निनादात ऊदे ग अंबे उदे च्या गजरात मंदीर गाभार्यात पहील्या माळेला सकाळी सात वाजता पासून श्री रेणुका मातेच्या वैदिक महा पूजेने सुरूवात झाली. घटस्थापने नंतर संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष तथा प्रथम जिल्हा न्यायाधीश प्रमुख, सुनिल वेदपाठक, यांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली. तर देविला पिवळ्या रंगाचे पैठणी महावस्त्र अलंकार अर्पण करून सिंगार करण्यात आले.घटस्थापने नंतर छबिना मिरवणूक काढण्यात येऊन परिसरातील परिवार देवतांची पूजा नैवेद्य व आरती कुमारिका पूजन करण्यात आले.यावेळी संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष सुनिल वेदपाठक,सचिव जेनित चंद्रा दोन्तुला यांच्या हस्ते करण्यात आली.
मंदिर फुलांनी सजले – भाविकांच्या गर्दी ने फुलले
साडेतीन शक्तिपीठांपैकी मूळ पीठ असलेल्या नांदेड जिल्ह्यातील माहूरच्या श्री रेणुका मातेच्या शारदीय नवरात्र उत्सवास आज घटस्थापनेने प्रारंभ झाला आहे. माहूर गडावर प्रशासन आणि मंदिर संस्थानच्या वतीने उत्सवाची तयारी करण्यात आली असून मंदिर ला फुलांनी सजविण्यात आले आहे.

अत्यंत रमणीय आणि निसर्गरम्य तसेच डोंगर आणि जंगलांनी व्यापलेल्या माहूर गडावर रेणुका माता विराजमान असून महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश सह देशभरातून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. श्री रेणुकामातेच्या नवरात्र उत्सवास घटस्थापनेपासून प्रारंभ होतो. घटस्थापने पूर्वी श्री रेणुका देवीचे मंदिर फुलांनी सजविण्यात आले होते
नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशीच दुपारी हजारो भाविक रांगेतून मातेचे दर्शन घेत असताना पावसाने जोरदार विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोंथूला तहसीलदार अभिजीत जगताप पोलीस निरीक्षक गणेश कराड मुख्याधिकारी विवेक कांदे नगराध्यक्ष फिरोज भाई दोसानी श्री रेणुका देवीचे व्यवस्थापक योगेश साबळे यांचे पोलीस होमगार्ड आणि न प कर्मचारी देवस्थान वरील सुरक्षारक्षकांनी भाविकांना त्रास होऊ नये याची खबरदारी घेतली.

