सेलिगमनचा डॉग या प्रयोगात उत्तर!’
मतांची चोरी झाली. सगळ्यांना पटली. तरीही देश हतबल. जन सुरक्षा कायदा आणला. त्याचा उपयोग वारकऱ्यांना नक्षलवादी ठरवण्यासाठी केला. महाराष्ट्र हतबल. मुसोलिनी ,हिटलर यांच्या तत्त्वज्ञानावर उभ्या केलेल्या संघटनेची नागपूर मध्ये मिरवणूक. लोकशाही पद्धतीने निवडलेला मुख्यमंत्री अर्धी चड्डी घालून त्यात सामील. कार्यालयात बेकायदा शस्त्रजमा केली. त्याची तक्रार देऊन सहा वर्ष झाली. दखल नाही . मी स्पेशल इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस दर्जाचा अधिकारी हतबल. मंगळावर स्वारी करणारा हा भारतीय मानव एवढा हतबल कसा?
सेलिगमन नावाच्या शास्त्रज्ञाने कुत्र्यांच्या वर प्रयोग केला. त्यात त्याचे उत्तर सापडलं. ’सेलिगमन्स डॉग’ म्हणून तो प्रयोग प्रसिद्ध आहे.
सेलिगमनने काही कुत्र्यांना एका बंद जागेमध्ये कोंडले. खाण्या पिण्याची व्यवस्था केली.पण त्याच वेळी त्यांना इलेक्ट्रिक शॉक देणे सुरू केले. शॉक बसायला लागल्यावर श्वान इतरत्र पळू लागले व बाहेर पडण्याची धडपड करू लागले.पण बाहेर पडण्याची संधी नसल्याने हतबल झाले.
सर्व प्रशासकीय यंत्रणा, मिडिया यावर पकड असलेले केंद्रातील मोदीजी, केंद्राचे पाठबळ असलेला आणि ब्राह्मणी व्यवस्था आणण्यासाठी पेटलेला फडणवीस, रेशीम बागेत ट्रेन झालेली व मुख्यमंत्र्यांची राखी बहीण रश्मी शुक्ला व तिचे चेले यामुळे अनुक्रमे देश, राज्य, आणि माझ्या सारख्या व्यक्ती हतबल झालेल्या आहेत.
सेलिगमनने आपल्या प्रयोगात थोडासा बदल केला. श्वानानी प्रयत्न केला तर त्यांना त्या जागेतून बाहेर पडता येईल अशा प्रकारे सोय केली पण शॉक देणे चालूच ठेवले. अशा वेळी किती स्वान पळून गेले असतील? अगर किती श्वानानी आपली सुटका करण्याचे प्रयत्न केले असतील? कोणीच नाही!
श्वानानी शॉक खाणे पसंत केले. शॉक खात राहिली.
शेजारचे श्रीलंका, बांगला देश,नेपाळ या देशात असेच चालू होते. तिथल्या जनतेने विशेषतः तरुणांनी संधी मिळताच बंड करून अन्यायी व्यवस्था उलथून टाकली! तरुणांची प्रचंड संख्या असलेल्या भारतात असे का घडले नाही?किंवा घडत नाही? प्रयोगातील श्वानाप्रमाणे भारतीय लोकांनी शॉक खाणे पसंत केले. आणि आजही शॉक खातात. सेलीगमनच्या प्रयोगातील श्वानांनी शॉक खाण पसंत केले. ती कोडगी बनली. सेलिंगमनने श्वानांच्या या वर्तनाला ’लर्नेड हेल्पलेस नेस’ म्हणजे अंगवळणी पडलेली हतबलता/कोडगेपणा असे नाव दिले. आज भारतीय जनतेने कोडगेपणा हतबलता अंगिकारली आहे. भारतीय माणसाची मूलभूत प्रेरणा आणि प्रवृती हतबल होण्याची आहे का?
व्यक्ती व समाजामध्ये निर्माण झालेली ही हतबलता झुगारून देता येते का? यावरील पुढचा प्रयोग पाहूया.
–सुरेश खोपडे.
