मुंबई( प्रतिनिधी)-राज्य शासनाच्या गृह विभागाने मोठ्या प्रमाणावर पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या, नियुक्त्या व पदोन्नती केल्या आहेत. 15 परिविक्षाधीन पोलीस उप अधीक्षकांना त्यांच्या पहिल्या नियुक्त्या देण्यात आल्या असून, 9 अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्या आहेत. 7 जणांना बदलून बदली मिळाली आहे.तसेच, सेवा जेष्ठतेनुसार 4 पोलीस निरीक्षक अधिकाऱ्यांना पदोन्नतीही देण्यात आली आहे.या बदल्यांचे आदेश गृह विभागाचे सहसचिव वेंकटेश भट यांच्या डिजिटल स्वाक्षरीने जारी करण्यात आले आहेत.नांदेड जिल्ह्यातील माहूर उप विभागात किरण हरिश्चंद्र भोंडवे यांना नियुक्ती देण्यात आली आहे.
✅ परिविक्षाधीन पोलीस उप अधीक्षकांच्या पहिल्या नियुक्त्या
राज्यभरात विविध ठिकाणी पुढील अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे:
अधिकारी नियुक्ती
प्रमोद बाळासो चौगुले उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपूर
केदार प्रकाश बारबोले सहाय्यक पोलीस आयुक्त, नागपूर शहर
संतोष आजिनाथ खाडे उपविभागीय पोलीस अधिकारी, मेहकर (बुलढाणा)
किरण हरिश्चंद्र भोंडवे उपविभागीय पोलीस अधिकारी, माहूर (नांदेड)
सागर शीलवंत देशमुख सहाय्यक पोलीस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर
शिवप्रसाद नानासाहेब पारवे सहाय्यक पोलीस आयुक्त, नागपूर शहर
शिवम दत्तात्रय विसापूर उपविभागीय पोलीस अधिकारी, साकोली (भंडारा)
किरण देविदास पोपळघट सहाय्यक पोलीस आयुक्त, नागपूर शहर
राजश्री सिद्धप्पा तेरणी उपविभागीय पोलीस अधिकारी, सातारा ग्रामीण
भागीरथी भरत पवार सहाय्यक पोलीस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर
रोहित गौतम ओव्हाळ सहाय्यक पोलीस आयुक्त, नागपूर शहर
पूजा विठ्ठल पवार उपविभागीय पोलीस अधिकारी, बीड
अद्विता मोहन शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त, नाशिक शहर
राहुल महादेव मडावी उपविभागीय पोलीस अधिकारी, जीमेलगट्टा (गडचिरोली)
भाग्यश्री हिरासिंग धीरबस्सी उपविभागीय पोलीस अधिकारी, नागपूर ग्रामीण
🔁 प्रशासकीय कारणास्तव 9 अधिकाऱ्यांच्या बदल्या
अधिकारी जुन्या पदावरून नवीन पद
राजेंद्र श्रीरंग शिरतोडे सहाय्यक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई उपविभागीय पोलीस अधिकारी, गंगाखेड (परभणी)
दिलीप देवराव टिप्परसे उपविभागीय पोलीस अधिकारी, गंगाखेड उपविभागीय पोलीस अधिकारी, अहिल्यानगर
दर्शन प्रकाशचंद दुग्गड (IPS) नियंत्रण कक्ष, पोलीस महासंचालक कार्यालय उपविभागीय पोलीस अधिकारी, मालेगाव कॅम्प (नाशिक)
प्रदीप मुरलीधर पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी, मेहकर उपविभागीय पोलीस अधिकारी, खामगाव
अशोक लालसिंग राजपूत पदसिद्ध परीक्षा पूर्ण सहाय्यक पोलीस आयुक्त, ठाणे शहर
विजय गणपतराव कुंभार सोलापूर शहर सहाय्यक पोलीस आयुक्त, पुणे शहर
विजयालक्ष्मी कुरी पुणे शहर सहाय्यक पोलीस आयुक्त, सोलापूर शहर
श्वेता विष्णू खाडे नागपूर शहर आर्थिक गुन्हे शाखा, सिंधुदुर्ग
आश्लेषा जितेंद्र हुले आर्थिक गुन्हे शाखा, सातारा पोलीस उपाधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे
🔄 7 अधिकाऱ्यांच्या पूर्वीच्या बदल्या पुन्हा बदलून नवीन बदली
अधिकारी नवीन बदली
वैशाली संतोष वैरागडे गुप्तवार्ता विभाग, नागपूर शहर
ज्योचना जयसिंग मसराम (मेश्राम) नक्षलविरोधी अभियान, नागपूर
रोशन पंडित सहाय्यक पोलीस आयुक्त, नागपूर शहर
स्वप्नील राजाराम राठोड सहाय्यक पोलीस आयुक्त, ठाणे शहर
संपात सखाराम शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर
माणिक विठ्ठलराव बेंद्रे सहाय्यक पोलीस आयुक्त, मुंबई शहर
अशोक आनंदराव कदम पोलीस अधीक्षक, लासूरत प्रतिबंधक विभाग, नांदेड
📈 सेवा जेष्ठतेनुसार 4 अधिकाऱ्यांना पदोन्नती
अधिकारी नवीन पद
अजित राजाराम टिके पोलीस अधीक्षक, अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, नागपूर
आरती भागवत बनसोडे उप आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मरीन रेंज, कोकण, मुंबई
नारायण देविदास शिरगावकर समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट 1.3, गडचिरोली
नितीन केशवराव जाधव पोलीस अधीक्षक, यूटीसी फोर्स वन, मुंबई
📌 महत्वाची नोंद
या बदल्यांमुळे राज्यातील पोलीस यंत्रणेत कार्यक्षमतेत वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. गृह विभागाकडून वेळोवेळी करण्यात येणाऱ्या अशा बदल्यांचा उद्देश कार्यक्षमता वाढवणे आणि प्रशासन अधिक गतिमान करणे हा आहे.
