नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात झालेल्या पावसाच्या नुकसानीसंदर्भाने राज्य शासनाने 553 कोटी 48 लाख 62 हजार रुपयंाचे तरतुद करून निधी वितरणासाठी मंजुरी दिली आहे.
नंादेड जिल्ह्यात पावसाने घातलेल्या थैमानीनंतर बरेच नुकसान झाले. शेतकऱ्यांचे नुकसान झाले, जनावरांचे मृत्यू झाले, वीज पडून लोकांचे मृत्यू झाले, पुरात लोक वाहुने गेले अशा अनंत घटना घडल्या. राज्य शासनाच्या महसुल व वनविभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकासानुसार व दरानुसार. मर्यादेतील शेती पिक नुकसानीनुसार नैसर्गिक आपत्तीसाठी अर्थ सहाय्य, राज्य आपत्ती निधीच्या मानाकानुसार, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या पिक नुकसानीसाठी द्यावयाचे अनुदान यासाठी एकत्रीतपणे 553 कोटी 48 लाख 62 हजार रुपये एवढा निधी वितरीत करण्यासाठी मंजुरी दिली आहे.
यातील लाभार्थ्यांना त्यांच्या बॅंक खात्यात थेट निधी वितरीत करण्यात यावा. एका हंगामात एकवेळेस विहित दराने लाभार्थ्यांना मदत मिळणार आहे. नांदेड जिल्ह्यात 7 लाख 74 हजार 313 शेतकरी बाधीत आहेत आणि 6 लाख 48 हजार 513 हेक्टर क्षेत्र बाधीत आहे. यासाठी 553 कोटी 48 लाख 62 हजार रुपयंाचा निधी वितरीत करण्यासाठी राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या शासन निर्णयावर महसुल व वनविभागाचे सहसचिव संपत सुर्यवंशी यांची डिजिटल स्वाक्षरी आहे.
नांदेड जिल्ह्यासाठी 553 कोटी 48 लाख 62 हजार एवढा निधी वितरण करण्यासाठी मंजुरी
