नांदेड(प्रतिनिधी)-14 सप्टेंबर रोजी दुपारी पोलीस अंमलदार बालाजी सातपुतेला मारहाण झाल्याच्या बातमीने खळबळ माजली होती. पण काल दि.18 सप्टेंबर रोजी रात्री 11.44 वाजता दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर नवीनच प्रकार समोर आला आहे. पोलीस विभागाने आमच्यासाठी प्रत्येक तक्रारदार हा तक्रारदारच असतो. आरोपी पोलीस असेल तरी आम्ही त्याची बाजू घेत नाही हे चाद दिवसांनंतर तरी दाखवले.
दि.14 सप्टेंबर रोजी दुपारी विष्णुपुरी येथे वजिराबादमध्ये कार्यरत पोलीस अंमलदार बालाजी सातपुते यांच्यावर जिवघेणा हल्ला झाल्याची बातमी पसरली. त्याबाबत शाहनिशाह करून वास्तव न्युज लाईव्हने ती बातमी प्रसारीत केली होती. दुसऱ्या दिवशी या प्रकरणात बालाजी सातपुते आणि त्यांच्या कुटूंबियांनी सुध्दा काही युवकांना आणि काही अल्पवयीन बालकांना जबरदस्त मार दिला ही माहिती समोर आली. त्यानंतर यातील जखमी युवकाची भेट घेतली तेंव्हा त्याने बालाजी सातपुते आणि त्यांच्या कुटूंबियांनी मारहाण केल्याची माहिती सांगितली. 14 ते 18 सप्टेंबर दरम्यान पोलीस त्याच्याकडे जात होते. परंतू त्याला बोलता येत नाही अशी नोंद घेवून परत जात होते. परंतू काल दि.18 सप्टेंबर रोजी पोलीसांनी जखमी रणदिपसिंघ शामसिंघ अग्नीहोत्री याचा जबाब नोंदवला. त्याने सांगितलेल्या शब्दामध्ये 14 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता त्याला त्याचा मित्र रणविरसिंगचा फोन आला आणि त्याने मला काळेश्र्वर मंदिराजवळ बोलावले आणि बालाजी सातपुतेचे घर दाखविण्यास सांगितले. रणविरसिंगसोबत त्याचे चार-पाच मित्र होते. आम्ही सर्व बालाजी सातपुते यांच्या घरासमोर गेलो आणि बालाजी सर असे म्हणून आवाज दिला. तेंव्हा बालाजी सातपुते, त्यांचा भाऊ केशव सातपुते, उध्दव सातपुते, आदित्य सातपुते, यश सातपुते आणि आदित्यचे आजोबा बाहेर आले आणि त्यांनी आम्हाला घातक शस्त्रांनी मारहाण केली आणि त्यामुळे माझे तीन दात तुटले, माझ्या छातीच्या उजव्या बाजूला, हाताच्या डाव्या दंडावर, पाठीवर खुब्यावर, छातीवर, लोखंडी गजाळीने मारहाण करण्यात आली. आम्ही सर्व तेथून पळून आलो आणि सध्या मी दवाखान्यात उपचार घेत आहे.
या तक्रारीनुसार नांदेड ग्रामीण पोलीसांनी बालाजी सातपुते त्यांचे दोन भाऊ, त्यांचे वडील आणि आदित्य व यश सातपुते अशा सहा जणांविरुध्द भारतीय न्याय संहितेच्या कलम 389(2), 191(2), 191(3), 117(2), 118(1), 115(2), 351(2), 151(3) प्रमाणे गुन्हा क्रमांक 893/2025 दाखल केला आहे. या गुन्ह्यामध्ये गंभीर मारहाण आहे. या सदरात कायद्याच्या दृष्टीकोणात 10 वर्षाची शिक्षा प्रस्तावित आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक कांबळे हे करीत आहेत.
संबंधीत बातमी..
पोलीस अंमलदार बालाजी सातपुते, त्यांचे बंधू आणि नातलगांनी मारहाण केल्याचे जखमी बालक सांगतो
