नांदेड, (प्रतिनिधी)- जवाहर नगर, तुप्पा येथील ज्येष्ठ नागरिक जुन्या पिढीचे गायक अर्जुन साळीकराम पंडित पैहलवान यांचे काल दि. १६ रोजी रात्री ९.३० वाजता निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. आंबेडकरी चळवळीतील आघाडीचे गायक क्रांतीकुमार पंडित यांचे ते वडील होत. दिवंगत अर्जुन पंडित यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, जावई, नातू असा परिवार आहे. नांदेड जवळच्या जवाहर नगर तुप्पा येथील स्मशानभूमीत दिवंगत अर्जुन पंडित यांच्या पार्थिवावर आज दि.१७ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
