* महाराष्ट्र स्टेट बॉल बॅडमिंटन चॅम्पियनशिप मध्ये लातूर जिल्ह्याला सुवर्णपदक*
चंद्रपूर– येथे दिनांक 12 ते 15 सप्टेंबर 2025 दरम्यान संपन्न झालेल्या 69 व्या महाराष्ट्र स्टेट बॉल बॅडमिंटन चॅम्पियनशिप (मुले-मुली) 2025 2026 या राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध 30 जिल्ह्यातील जवळपास 600 खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.*
*सदरील स्पर्धेत लातूर जिल्हा संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत नाही पुणे महानगर जिल्ह्याच्या संघासोबत अंतिम सामन्यात दोन एक अशा तीन सेटच्या अटीतटीच्या सामन्यात विजय मिळवून सुवर्णपदकासह महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला*
स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी लातूर जिल्हा संघाने नागपूर व कल्याण डोंबिवली या जिल्ह्यांवर एकतर्फी विजय मिळवत स्पर्धेच्या सुवर्णपदकावर आपल्या दावेदारीचा इशाराच दिला. पुढे कोल्हापूर संभाजीनगर या जिल्ह्यांवर विजय मिळवित उप उपांत्य फेरीत हिंगोली जिल्हा संघावर विजय मिळवित उपांत्य फेरीत पुणे जिल्हा संघासोबत च्या सामन्यात एकतर्फी विजय मिळवीत रुबाबात अंतिम सामन्यात प्रवेश केला. फायनल मॅच मध्ये लातूर जिल्हा संघावर पुणे महानगर जिल्ह्याचा संघ वरचढ ठरत असताना लातूर जिल्ह्याचे अनुभवी बॅक राष्ट्रीय शूटर अकबर पठाण व उत्कृष्ट राष्ट्रीय खेळाडू म्हणून नामांकित असलेला नईम शेख यांनी केलेल्या बेस्ट शूटिंग व प्लेसिंग तसेच संघात असलेले आंतरराष्ट्रीय खेळाडू व स्टार ऑफ इंडिया पुरस्कार प्राप्त पोलीस उपनिरीक्षक असद शेख यांच्या अनुभवी खेळाने लातूर जिल्हा संघाने पुणे महानगर संघावर 32-35, 35-31, 35-21 असा तीन सेट मध्ये विजय मिळवित लातूर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदकाचे मानकरी ठरला.
लातूर जिल्ह्याच्या विजयामध्ये कर्णधार फैजान शेख, नेट चेकर अदनान शेख, बॅक प्लेयर अर्शद, शेख,रितेश घोटमुकले, आमेर शेख, जीशान, रितेश पेटकर यांच्या उत्कृष्ट खेळाचे मोलाचे योगदान आहे.
विजयी संघास प्रशिक्षक सय्यद आयुब सर, मनीषा सूर्यवंशी मॅडम, आयान सर व सय्यद तबरेज सर यांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभले आहे.
तसेच लातूर जिल्हा मुलींच्या संघात कर्णधार साक्षी रोकडे, रोहिणी सूर्यवंशी, नंदनी सूर्यवंशी, साक्षी इंगळे, सुमती सगरे, देवयानी सूर्यवंशी, तनवी गायकवाड या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
विजयी संघास आमदार सुधाकर अडबाले (नागपूर शिक्षक मतदार संघ), राज्य सचिव श्री अतुल इंगळे, राज्य अध्यक्ष श्री. पी के पटेल, कार्याध्यक्ष श्री. डी एस गोसावी, कोषाध्यक्ष विजय पळसकर, उपाध्यक्ष रिंकू पापडकर, भारतीय रेल्वे प्रशिक्षक पी. हनुमंता राव, आयोजन सचिव श्री प्रकाश सातपैसे यांच्या हस्ते विजयी चषक व विजयी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
लातूर जिल्हा संघाने गेल्या पंधरा वर्षापासून शालेय स्पर्धा, विद्यापीठ स्पर्धा, असोसिएशन-फेडरेशन स्पर्धा, अशा विविध राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्र व देशपातळीवरील अनेक स्पर्धात आपल्या कौशल्याने विजय प्राप्त केलेले आहे.
जिल्ह्यातील राष्ट्रीय खेळाडू अकबर पठाण,चेतन मुंडे, नईम शेख,अदनान शेख, तानाजी कदम, अर्शद शेख, संगमेश्वर लाटे, माधव सोनटक्के, आशु शेख, मारुती सगरे, फैजान शेख, विकास जायभाये, वैभव कदम, मिरान शेख, प्रशांत सुरनर, निहाल पठाण, माधव भिसे, किरण पौळ, अयाज शेख, यश जाधव, सचिन भगत, अभिजीत बी एल, तसेच राष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडू – मनीषा सूर्यवंशी,उज्वला कांबळे, पृथ्वी यादव,पूजा राठोड, विद्या अंभोरे, कल्पना पौळ, नीता बानाटे, आशा जाधव, कोमल पौळ, प्रणिता ठवरे, राधा गाडगे, स्वाती औसेकर, अनु पाटील, मनीषा माने, अश्विनी राठोड, स्वाती मुंडे, गंगा केंद्रे, रोहिणी सूर्यवंशी, प्रणिता सूर्यवंशी, कांचन उमाटवाडे, वैष्णवी सूर्यवंशी, मयुरी, साक्षी रोकडे या खेळाडूंनी नेत्र दीपक कामगिरी करत राज्यस्तरीय स्पर्धात अनेक पदक प्राप्त करीत देशपातळीवर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत यश संपादन करून जिल्ह्याचे व महाराष्ट्राचे नाव उज्वल केलेले आहे.
*लातूर जिल्ह्याचे भूमिपुत्र व सध्या पोलीस दलामध्ये एक निर्भीड व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे असद शेख यांनी या खेळात अनेक जिल्हा राज्य व राष्ट्रीय स्पर्धा विजय मिळवित देशाचे प्रतिनिधित्व करीत सुवर्णपदक प्राप्त करून मानाचा स्टार ऑफ इंडिया हा पुरस्कारही मिळविला असून त्यांच्या मार्गदर्शनात असद स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये या सर्व खेळाडूंना प्रशिक्षण दिले जाते*
राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत विजय संपादन करून लातूर जिल्ह्याचे नाव उज्वल करणाऱ्या या खेळाडूंचे व तमिळनाडू येथे होणाऱ्या ऑल इंडिया नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये निवड झालेले जिल्ह्याचे खेळाडू बेस्ट शूटर – अकबर पठाण, बेस्ट प्लेयर ऑफ महाराष्ट्र – नईम शेख, राष्ट्रीय खेळाडू – साक्षी रोकडे या खेळाडूंचे डॉक्टर वैभव रेड्डी, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष संगमेश्वर नीला, उपाध्यक्ष श्री ज्ञानोबा भोसले, सहसचिव श्री धनंजय कोत्तापल्ले, मेहराज सर, प्रमोद पाटील, शफी शेख, प्राध्यापक विनोद माने, अश्रफ शेख यांनी सत्कार करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
