नांदेड(प्रतिनिधी)-हिमायतनगर येथे चोरी करतांना एका व्यक्तीला पकडण्यात आले आहे. रहेमतनगर नांदेडमध्ये एक घरफोडून चोरट्यांनी 3 लाख 81 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरला आहे. गांधीनगर नांदेड येथे एका सराफा दुकान फोडून चोरट्यांनी 2 लाख 98 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे.
संतोष गणपतराव आलेवाड यांचे हिमायतनगरमधील नारायणनगरमध्ये घर आहे. 14 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजेच्यासुमारास त्यांच्या घरातून 30 हजार रुपयांचे साहित्य चोरून नेणाऱ्या करण भोजू पिकलेवाड रा.गंगानगर किनवट यास पकडले. हिमायतनगर पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 221/2025 दाखल केला आहे. पोलीस अंमलदार जाधव अधिक तपास करीत आहेत.
जुनेद अहेमद खान मसुद खान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 14 सप्टेंबरच्या रात्रव्ी 10 ते 15 सप्टेंबरच्या दुपारी 11 वाजेदरम्यान त्यांच्या घराचा कडीकोंडा कुलूप तोडून कोणी तरी चोरट्यांनी कपाटातील 3 लाख 81 हजार 500 रुपयांचे सोन्याचे दागिणे चोरून नेले आहे. इतवारा पोलीसांनी हा गुन्हा क्रमांक 294/2025 प्रमाणे दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरिक्षक रमेश गायकवाड यांच्याकडे देण्यात आला आहे.
विनोद सुर्यकांतअप्पा यनगंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गांधीनगर त्यांचे श्री अलंकार हे सोन्या-चांदीचे दुकान आहे. 12 सप्टेंबरच्या सायंकाळी 6 वाजेपासून ते 13 सप्टेंबरच्या पहाटे 4.30 वाजेदरम्यान त्यांच्या दुकानाचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे 2 लाख 98 हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिणे चोरट्यांनी चोरून नेले आहे. विमानतळ पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 367/2025 प्रमाणे दाखल केली असून पोलीस उपनिरिक्षक साने अधिक तपास करीत आहेत.
इतवारा भागात 3 लाख 80 हजारांची चोरी ; गांधीनगर भागात ज्वेलर्स दुकान फोडले 3 लाखाचे दागिणे चोरले; हिमायतनगरमध्ये चोरी करतांना चोरटा पकडला
