उद्या 17 सप्टेंबर आहे. हा दिवस भारताच्या राजकारणातील परिस्थितीला एक वेगळे वळण देणारा ठरू शकतो काय? या दिवशी अनेक महत्वाच्या घटना घडलेल्या आहेत. 17 सप्टेंबर रोजी दक्षीण भारतातील वायकोम सत्याग्रह आणि जस्टीस पार्टीचे प्रमुख पेरियार ई.व्ही. रामासामी यांचा सुध्दा जन्म झालेला आहे. तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही जन्म दिवस आहे. मराठवाड्याच्या दृष्टीकोणातून 17 सप्टेंबर रोजीच मराठवाडा निजाम राज्यातून स्वतंत्र झाला होता. यात सर्वात महत्वपुर्ण घटना म्हणजे विरोधी पक्ष नेते खा.राहुल गांधी आणि कॉंगे्रस पक्षाने हा 17 सप्टेंबर हा दिवस हायड्रोजन बॉम्ब फोडण्यासाठी अत्यंत चाणाक्षपणे निवडलेला आहे. तेंव्हा उद्या देशाचे राजकारण बदलेल काय? उद्या काही अशी घटना घडले काय की, इतर घटनांना विसरुन फक्त भारताचेच नव्हे तर जगाचे लक्ष त्या घटनेकडे केंद्रीत होईल. या शतकातील मोठा बदल घडणारा दिवस 17 सप्टेंबर तयार होईल काय असे अनेक प्रश्नांची उत्तरे उद्या मिळणार आहेत.
पब्लिक इंडियाचे प्रा.अखिल स्वामी यांनी उद्या येणारा 17 सप्टेंबर हा दिवस मोठा खतरनाक मानला आहे ते सांगतात. ई.व्ही. रामासामी हे यांचा जन्म 17 सप्टेंबर 1879 रोजी झाला. ते केरळमधील खुप मोठे प्रस्थ बनले होते. त्यांनी अस्पृशता, अनुसूचित जातीच्या लोकांना मंदिर प्रवेश, बाम्हणांच्या वर्चस्वाविरुध्द बंड, असे अनेक आंदोलन केले. त्यामुळे द्रविड आंदोलनाची प्रेरणा मिळाली आणि ते आजही सुरु आहे. पेरियार हे एवढे मोठे व्यक्ती आहेत की, आजही त्यांचा जन्मोत्सव सोहळा पार पडणार आहे. आजही पेरियार यांच्या समर्थनात आणि विरोधात बरेच लोक आहेत. पंरतू त्यांच्याबद्दल वाईट बोलण्याची ताकत कुणाची नाही.
भारत स्वातंत्र्य झाला तेंव्हा मराठवाडा हा पारतंत्र्यांतच होता. निजामच्या राजवटीत अडकलेला मराठवाडा नंतर पोलीस ऍक्शनने स्वतंत्र झाला. तो दिवस सुध्दा 17 सप्टेंबर आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन सुध्दा 17 सप्टेंबर आहे. या दिवशी ते 75 वर्ष पुर्ण करणार आहेत. भाजपच्या अलिखित नियमाप्रमाणे 75 वर्ष पुर्ण करणारे नेते यांनीच मार्गदर्शक मंडळात पाठविले. मग यांना हा नियम का नाही. हा मुद्दा सुध्दा उद्या उचलला जाऊ शकतो. अखिल स्वामी यांच्या मते ज्याप्रमाणे सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा होता. तसेच पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांचा जन्मदिवस बालक दिन म्हणून साजरा केला जातो. प्रा.अखिल स्वामी यांना वाटते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 17 सप्टेंबर रोजी अशीच काही घोषणा करतील काय? परंतू सर्वपल्ली राधाकृष्णन आणि पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या बरोबरीची उंची नरेंद्र मोदी यांची नाही. तरी पण उद्या नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस त्यांचे भक्ततर मोठ्या प्रमाणात साजरा करतील.
अखिल स्वामी यांच्या मते विरोधी पक्ष नेते खा.राहुल गांधी तथा कॉंगे्रस पक्षाने 17 सप्टेंबर हा दिवस हायड्रोजन बॉम्ब फोडण्यासाठी अत्यंत चाणाक्ष पणे निश्चित केलेला आहे. कारण या दिवशी जो काही बॉम्ब फुटेल त्याचे उत्तर देतात-देता निवडणुक आयोग आणि भारतीय जनता पार्टी यांच्या नाकीनऊ येणार आहेत. कारण त्यांनी महादेवपुरा मतदार संघातील सत्यता जनतेसमोर आणली. ती तथ्यांवर आधारीत आहे आणि हायड्रोजन बॉम्बमधील सत्यता सुध्दा तथ्यांवर आधारीत असेल. मग या परिस्थितीत त्या तथ्यांची उत्तरे बनावटपणा करून देता येणार नाहीत. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईच्या संभाषणाचा एक एआय व्हिडीओ बिहार कॉंगे्रसने प्रसारीत केला. त्यासाठी देशभर भारतीय जनता पार्टीने निर्देशने केली. पण त्यानंतर खा.राहुल गांधी, त्यांच्या आई खा. सोनिया गांधी या एका बारमध्ये जातात तेथे एक नृतिका नृत्य करत असते आणि तेंव्हा खा.सोनिया गांधी खा.राहुल गांधी यांच्या कानात काही तरी सांगत आहे असा व्हिडीओ भाजपने प्रसारीत केला. मग नरेंद्र मोदी यांच्या व्हिडीओमध्ये अपमान आहे. तर खा.राहुल गांधी आणि खा.सोनिया गांधी यांच्या व्हिडीओमध्ये अपमान नाही काय? उलट नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ सुसंस्कृत भाषेत आहे. पण भारतीय जनता पार्टीने तयार केलेला व्हिडीओ हा अत्यंत गलिच्छ दर्जाचा आहे. असा अनेक घटना आहेत. ज्यामध्ये आमचीच लाल म्हणण्याचा प्रकार घडत आहे. परंतू 17 सप्टेंबर हा दिवस देशातील राजकारण बदलणारा ठरेल. त्यानंतर देशातील नवीन राजनिती नागरीकांना पाहायला मिळेल. ज्यामध्ये विदेश निती बदलेल, युवकांना नोकऱ्या मिळतील, शेतकऱ्यांना हमी भाव मिळेल आणि सर्वात महत्वाचे हिंदु-मुस्लिम बंद होऊन जाईल असे मत प्रा.अखिल स्वामी यांचे आहे.
17 सप्टेंबर रोजी देशाचे राजकारण पुर्णपणे बदलून नव्या दिशेने प्रवास सुरू करणार काय?
