नांदेड(प्रतिनिधी)-एका डिलेव्हरी बॉयला थांबवून तिन विधीसंघर्षग्रस्त बालकासह पाच जणांनी त्याच्या खिशातील 5 हजार 500 रुपये रोख रक्कम बळजबरीने काढून घेतल्याचा प्रकार घडला आहे.
योगेश अशोक पंडीत हे झोमॅटो डिलेव्हरी बॉय आहेत. 12 सप्टेंबर रोजी रात्री 10.30 वाजेच्यासुमारास ते आपल्या ग्राहकाला डिलेव्हरी देवून परत येत असतांना अक्षय पांढरे (22) बुध्दभूषण गोडबोले (18) आणि इतर तिन विधीसंघर्षग्रस्त बालक अशा पाच जणांनी त्यांना आडवले. त्यांचा स्कुटी क्रमांक एम.एच.26 सी.जी.7565 ची चाबी काढून बाजूला फेकून दिली आणि तु येथे कसा आलास असे सांगत त्यांच्या खिशातून 5 हजार 500 रुपये बळजबरीने काढून घेतले. सोबतच अशोक पंडीत यांना लाथाबुक्यांनी मारहाण करून पळून गेले. भाग्यनगर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 502/2025 प्रमाणे दाखल केली असून पोलीस उपनिरिक्षक हनुमंत शिंदे अधिक तपास करीत आहेत.
डिलेव्हरी बॉयला मारहाण करून लुटले
