लखनऊ विमानतळावर विमानाची दुर्घटना होणार होती पण वाचली त्यात खा.डिम्पल यादवसह 151 प्रवाासी होते

लखनऊ-काही महिन्यापुर्वी अहमदाबाद विमानतळावर घडलेल्या दुर्घटनेप्रमाणेच आज लखनऊ विमानतळावर घडणार होती. मात्र सुदैवाने पायलटने अबेंडंट फ्लाईट असा संदेश एटीसीला दिला आणि तातडीचे ब्रेक वापरून विमानाला थांबवले. या विमानात समाजवादी पक्षाचे प्रमुख खा.अखिलेश यादव यांच्या पत्नी खा.डिम्पल यादवसह 151 प्रवासी होते. सोबतच कु्र मेंबर यांची संख्या वेगळी. सुदैवाने आज हा प्रकार घडला नाही. या विमानाच्या पायलटला थ्रस्ट मिळत नव्हता. म्हणूनच त्याने असे केले. अहमदाबाद विमानतळावरच्या अपघातात सुध्दा पायलटला थ्रस्ट मिळत नव्हता. इंडिगोने मात्र तांत्रिक बिघाडामुळे असे घडल्याचे सांगितले आहे.सर्व प्रवाशांना दुसऱ्या फ्लाईटने दिल्लीला पाठविण्यात आले आहे.
आज लखनऊ विमानतळावर मोठी विमान दुर्घटना टळली. यामध्ये खा.डिम्पल यादव यांच्यासह 151 प्रवासी वाचले आहेत. विमानाला इमर्जेंसी लैंडिंग करावी लागली. आज दुपारी फ्लाईट क्रमांक 6 ई-2111 ही इंडिगो कंपनीची फ्लाईट लखनऊ ते दिल्लीसाठी जाणार होती. हे विमान धावपट्टीवर धावत असतांना पायलटला ती गती प्राप्त झाली होती. जी धावण्यासाठी आवश्यक असते. पण उंची साधण्यासाठी आवाश्यक असलेली ताकत मिळत नव्हती. म्हणूनच पायलटने एटीसीला अबेंडंट फ्लाईट असा संदेश दिला आणि तातडीचे ब्रेक वापरून विमान थांबवले. या घटनेमुळे विमानातील प्रवाशांमध्ये हडकंप माजला. मात्र सर्व प्रवाशांना सुरक्षीत बाहेर काढून दुसऱ्या फ्लाईटने दिल्लीला रवाना करण्यात आले.


विमान उडाणामध्ये थ्रस्ट हा प्रकार अत्यंत महत्वाचा आहे. सोबतच अबेंडंट टेकऑफ आणि रिजेक्टेड टेकऑफ असे दोन शब्द एव्हीएशनचे आहेत. त्यामध्ये अबेंंडंट टेकऑफ बाबतचा निर्णय पायलट घेतो आणि रिजेक्टेडचा पण पायलटच घेतो. पण रिजेक्टेडमध्ये धावपट्टीवर काही अडथळा असेल तेंव्हा तो घेतला जातो. या विमान घटनेबद्दल इंडिगोने तांत्रिक बिघड असे सांगितले आहे. मागील काही दिवसांपासून भारतातील कोणत्याही कंपनीच्या विमानत उड्डाणात अनेक तांत्रिक अडचणी आलेल्या आहेत. डीजीसीएने या घटनेचा अहवाल मागितला आहे. काही दिवसांपुर्वीच झालेल्या अहमदाबाद विमान दुर्घटनेचा अहवाल अद्याप आलेला नाही. लोक त्या घटनेला विसरले आहेत. अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान टेकऑफ नंतर फक्त दीड मिनिटात कोसळले होते. आजच्या या घटनेने आम्हाला पुन्हा एकदा अहमदाबाद दुर्घटनेची आठवण करून दिली. ज्याचा अहवाल 90 दिवसात यायचा होता. 12 जुलै 2025 रोजी ती घटना घडली होती. आज 14 सप्टेंबर ही तारीख आहे. म्हणजे 90 दिवसांपेक्षा जास्त काळ झालेला आहे.परंतू सुदैवाने लखनऊ येथे दुर्घटना घडली नाही. त्यासाठी परमेश्र्वराचे उपकारच मानायला हवे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!