नांदेड –स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि पुणे येथील एस्पायर नॉलेज स्किल्स कंपनीतर्फे आज १३ सप्टेंबर रोजी मेगा जॉब फेअर घेण्यात आला. भर पावसातही बेरोजगार तरुणांनी या जॉब फेअरला उपस्थिती लावून चांगला प्रतिसाद दिला. संपूर्ण महाराष्ट्रातून बेरोजगार विद्यार्थी मुलाखतीसाठी येथे आले होते. ३० कंपन्यांच्या प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांनी मुलाखती दिल्या. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या २०सप्टेंबर रोजी दीक्षान्त समारंभामध्ये महाराष्ट्र राज्याची उच्च व तंत्रज्ञान शिक्षण मंत्री ना चंद्रकांत दादा यांच्या हस्ते नियुक्ती आदेश देण्यात येणार आहेत. असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोज चासकर यांनी कळविले आहे.

या जॉब फेअर मध्ये छत्रपती संभाजी नगर, पुणे, मुंबई, नाशिक, नांदेड आणि हैदराबाद येथील जवळपास ३० कंपन्यांनी सहभाग घेतला होता. आयटीआय, बारावी पास, पदवीधर, पदव्युत्तर, डिप्लोमा, इंजीनियरिंग इत्यादी अभ्यासक्रमांमधील विद्यार्थ्यांनी मुलाखती दिल्या. परदेशी भाषा अवगत असलेल्या विद्यार्थ्यांना तर भारताबाहेरी नोकरीचे संधी या फेअरच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत.
यापुढे वर्षातून दोन वेळा जॉब फेअरच्या आयोजन विद्यापीठामध्ये करण्यात येणार आहे असा सामंजस्य करा पुणे येथील एस्पायर नॉलेज अँड स्किल्स कंपनीसोबत करण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांना या जॉब फेअर मध्ये नोकरी मिळाली नाही त्यांच्याकडून विविध आवश्यक ते ऑनलाईन कोर्स करून घेण्यात येणार आहेत व त्यांना पुढील मुलाखतीसाठी तयार करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी नोकरी लागण्यासाठी व स्वतःच्या पायावर उभारण्यासाठी संपूर्ण मदत विद्यापीठातर्फे करण्यात येणार आहे. असेही कुलगुरू डॉक्टर चासकर यांनी यावेळी सांगितले. यावेळी विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ अशोक महाजन एस्पायर चे संचालक संजय गांधी, मा व्य परिषद सदस्य डॉ डी एन मोरे, नारायण चौधरी, आदीसभा सदस्य दीपक मोरताळ, अधिष्ठता एम के पाटील, डॉ डी एम खंदारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या मेगा जॉब फेअरला यशस्वी करण्यासाठी समन्वयक डॉ शशिकांत ढवळे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ बालाजी मुधोळकर डॉ कृष्णा चैतन्य डॉ योगेश लोलगे डॉअर्चना साबळे डॉ नितीन दारकुंडे डॉ राजकुमार मून, जनसंपर्क अधिकारी डॉ अशोक कदम यांनी परिश्रम घेतले आहेत.

