मागील काही दिवसांपासून नेपाळमध्ये सुरू असलेल्या धुमस चक्रीमध्ये सध्या बालेंद्र शाह यांनी नेपाळच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. त्यांच्याबद्दल असे बोलले जाते की, ते अमेरिकेचे समर्थक आहेत. नेपाळमध्ये जनतेतील काही लोक राजशाही पुन्हा हवी असे म्हणतात. पण त्या विचाराला विरोध करणारी मंडळी आहे. अशा परिस्थितीत नेपाळचे सैन्यप्रमुख अशोकराज सिकदेल यांनी एक संदेश प्रसारीत केला. ज्यामध्ये जनतेला शांततेचे आव्हाण करण्यात आले. पण हा संदेश प्रसारीत करतांना सैन्यप्रमुख अशोकराज सिकदेल यांच्या पाठीमागे पृथ्वी नारायण शाह या राजांची फोटो आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजशाहीची चर्चा सुरू झाली. भारतात सुध्दा नेपाळमध्ये हिंदु राष्ट्र असावे आणि राजशाही असावी असे सुर निघत आहे. या सर्व घटनाक्रमाचा आढावा घेतांना सेवानिवृत्त मेजर मनोज गौरव आर्य यांनी आपल्या द चाणक्य डायलॉग या वृत्तवाहिनीवरून विश्लेषण प्रसारीत केले आहे.
याबद्दल मनोज आर्य सांगतात. पृथ्वी नारायण शाह हे 18 व्या शतकात तेथे राजे होते. ते शाह राजवंशाचे व्यक्ती आहेत. त्यावेळी नेपाळ हा देश अनेक राज्यांमध्ये विखुरलेला होता. भारतातील सुबेदारीप्रमाणे. तेंव्हा नेपाळ एक संघट राज्य, देश बनविण्यामध्ये राजा पृथ्वीनारायण शाह यांनीच मेहनत घेतली. त्यांनी नेपाळला अत्याधुनिक शस्त्रे बाळगणारे सैन्य दिले. आधुनिक नेपाळचे ते जनक आहेत. सैन्यामध्ये ज्या बटालीयन असतात. त्या बटालीयन त्यांनी सुुरु केल्या. आज जगभर सर्वच देशामध्ये सैन्याचे जे बटालीयन आहेत. त्याचे उगमस्थान नेपाळ असून राजा पृथ्वीनारायण शाह यांच्यामुळे ते घडले आहे.

नेपाळ देशातील सैन्य त्यांचा भरपूर आदर करते. नेपाळच्या सैन्य परिसरात अनेक जागी राजा पृथ्वीनारायण शाह यांचे नावेत आहेत. सैन्याच्या परिसरात अनेक जागी त्यांचे फोटो आहेत. सध्या नेपाळमध्ये सुरू असलेल्या असंतोषात राजा पृथ्वीनारायणसिंह यांची फोटो आपल्या मागे ठेवून सैन्यप्रमुख अशोकराज सिखदेव यांनी दिलेले संदेश चर्चेसाठी आले. या संदेशानंतर नेपाळमध्ये आणि भारतात वेगवेगळ्या प्रकारच्या घंट्या वाजू लागल्या. जगात एकच हिंदु राष्ट्र होते आणि ते म्हणजे नेपाळ. भारत हा सेक्युलर (समाजवादी) देश आहे. नेपाळमध्ये राजांना भगवान विष्णुचा अवतार मानले जाते आणि राजांचा उल्लेख करतांना श्रीश्रीश्रीश्रीश्री असा उल्लेख होत होता. म्हणून त्यांना पंच सरकार असे बोलले जाते. राजा पृथ्वीनारायण शाह यांच्या काळात नेपाळमध्ये 50 हजार सैन्य होते. त्यानंतर नेपाळच्या राजघराण्यात हत्याकांड घडले आणि राजा ज्ञानेंद्र विर विक्रम शाहदेव झाले. पुढे पुष्पकमलदास उर्फ प्रचंड हे पंतप्रधान झाले. त्यांनी जनतेचा लढा सुरू केला. त्यांच्यावर चिनचा प्रभाव होता. माऊत्ससेतुंग यांच्याविचारांचा प्रभाव होता आणि त्यांनी राजशाही विरुध्द लढा दिला. त्या लढ्यात 17 हजार लोक मारले गेले. पुढे सरकारे बदलली. राजांना राजभवनात राहण्यास सांगण्यात आले. पण प्रचंडची निष्ठा मात्र चिनसोबत होती. भारतात नक्षलवादाचा जो विचार आहे. तोच चिनचा विचार आहे. पुढे नेपाळमध्ये के.पी. शर्मा ओली हे पंतप्रधान झाले असे आलटून पालटून प्रचंड आणि ओली हेच पंतप्रधान होत गेले. त्यानंतर राजशाही परत हवी असा विचार नेपाळमध्ये धुमसु लागला. वाचकांना असे वाटेल की, लोकशाही हा राज्यप्रकार नेपाळच्या जनतेला का पसंत नाही. जगात 57 मुस्लीम देश आहेत. त्यातील 55 मध्ये लोकशाही नाहीच. फक्त खोटा प्रचार केला जातो की, आम्ही लोकशाहीप्रमाणे वागतो.
युनायटेड अरब अमिरातमध्ये सुध्दा लोकशाही नाही तर राजेशाही आहे. आजच्या परिस्थितीमध्ये यु.ए.ई.मध्ये उपलब्ध असलेल्या सुविधा जगात कोठेच नाहीत. तेथील जनतेला राहण्यासाठी घर, आरोग्याची सोय, शिक्षण मोफत आहे. याचा अर्थ असा आहे की, राज्य कोणत्याही असेल नागरीकांना स्थैर्य हवे असते. नेपाळमध्ये राज्यशाही होती तेंव्हा पण स्थैर्य होते. कारण ज्या पध्दतीने जनतेची कामे करायला हवी ती सर्व होत होती आणि नागरीक आनंदी होते. पण पंतप्रधान आल्यानंतर चिनकडून निधी मिळाला. माओवादी पंतप्रधानांनी उनमाद माजवला. कारण माओवादी विचारांमध्ये कोणी एक दुसऱ्यापेक्षा मोठा नाही. सर्व नागरीक समान आहेत. हे विचार ऐकायला सुंदरच वाटतात. परंतू बोलणे आणि करणे यात नेपाळमध्ये फरक आला. आज अनेक जण नेपाळमधील परिस्थितीसाठी चिन आणि अमेरिकेला दोष देत आहेत आणि हे खरे पण आहे. आग लागल्यानंतर त्यात चिन आणि अमेरिकेने तुप टाकले असेल. पण तुप एकटे जळत नसते. आग नेपाळमध्येच तयार झाली.
जनतेने पाहिले की, पंतप्रधान ओली आणि प्रचंड यांचे जीवनमान किती उंच आहे, त्यांच्या कुटूंबाचे जीवनमान किती उंच आहे. नेपाळच्या ग्रामीण भागात विज उपलब्ध नाही. स्वच्छ पाणी प्यायला मिळत नाही, शिक्षणाची सोय नाही पण माओवादी विचारणश्रेणी दाखवणारे गरीबांचे देव आणि त्यांची मुले मात्र इग्लंड, इटलीमध्ये राहतात. त्यंाच्याकडे कोट्यावधी रुपयांची वाहने आहेत. पण चिनने पोसलेला माणुस नेपाळच्या गादीवर बसलेला आहे. मग चिनला कोण प्रश्न विचारणार. एक गट राजा हवा म्हणणारा आणि दुसरा नको म्हणणारा या दोन गटांमध्ये आपसात खटके उडू लागले. पुढे पत्रकार, जनता, सिव्हील सोसायटीचे लोक हा मुद्दा उचलू लागले की नेपाळमध्ये भ्रष्टाचार का होत आहे. छोटे-छोटे काम करण्यासाठी पैसे द्यावे लागत आहे. प्रशासकीय यंत्रणाय ठप्प पडली आहे. आपल्या कामासाठी कोण्या तरी मोठ्या माणसाची शिफारस आणावी लागते. अशा चर्चा सुरू झाल्या.
नेपाळ सरकारने न्यायालयाच्या माध्यमातून एक आदेश पारी करायला लावला. त्यात सोशल मिडीयाची नोंदणी करणे आवश्यक करण्यात आले. पण नोंदणी झाली नाही. तेंव्हा न्यायालयाने सोशल मिडीयावर बंदी लावली. मग जनता रस्त्यावर उतरली. तेंव्हा पोलीसंानी गोळीबार केला. गोळीबारात 20 जण मरण पावले. सरकारने भिऊन सोशल मिडीया पुन्हा सुरू केला. परंतू सोशल मिडीया सुरू झाल्यानंतर 24 तासात पुन्हा एकदा नेपाळमध्ये आग लागली. आजच्या परिस्थितीत नेपाळमध्ये एक लोकशाही प्रस्तापित होवून तिने जनतेचे आवाज पुढे नेण्याचे काम करावे. किंवा नेपाळमध्ये राजशाही असावी. आम्ही तर शेजारी आहोत. जर आम्ही त्यांना आपले भाऊबंधू मानत असू तर नेपाळच्या लोकांना जे उत्कृष्ट वाटते. त्याचा आदर करणे आमची सुध्दा जबाबदारी आहे. पण आम्ही त्यांना भाऊ बंधू मानत नसू तर होवू द्या तेथे काय व्हायचे ते. नेपाळमध्ये राजशाही असो किंवा लोकशाही आम्ही त्यांच्यासोबत राहु परंतू भारताला दक्ष राहण्याची गरज आहे. कारण आता नेपाळला युध्दाचे मैदान बनविण्यात आले आहे. तेथील एक गट चिनकडे आणि दुसरा अमेरिकेकडून लढत आहे आणि या धुमस चक्रीत भरडला जातो तो नेपाळचा सर्वसामान्य नागरीक.
